शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

वाढत्या गुन्हेगारीने सामान्यांत धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 01:46 IST

तळेगाव शहर परिसरासह मावळ तालुक्यातील अलीकडच्या काळातील गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतनीय बनला

तळेगाव दाभाडे : तळेगाव शहर परिसरासह मावळ तालुक्यातील अलीकडच्या काळातील गुन्हेगारीचा वाढता आलेख हा चिंतनीय बनला असून, वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य माणूस धास्तावला गेला आहे. माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची पूर्ववैमनस्यातून रविवारी भर दिवसा झालेली निर्घृण हत्या , हत्येची पद्धत यांमुळे सारे शहर हादरले आहे. सप्टेंबर महिन्यात चेतन दत्तात्रय पिंजण (वय १७) या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच दोन मित्रांनी किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून महाविद्यालय परिसरात भर दिवसा खून केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिसांच्या सतर्कतेमुळे मागील महिन्यात तळेगाव नगर परिषदेचे पक्षप्रतोद व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा कट फसला. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. तालुक्यातील गुन्हेगारी व हिंसक प्रवृत्तीत दिवसेंदिवस होणारी वाढ ही चिंतनीय बाब बनली आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे जाळेच पसरले आहे. लूटमार, खून, हत्या यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुक्यातील वातावरण दूषित झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या मावळला निकोप वातावरणाची गरज आहे. युवा पिढी बिघडू लागल्याने समाजाची मोठी हानी होणार आहे. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीक आल्या आहेत. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात ग्रामपंचायतीच्या मतदानाच्या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज यांच्यावर गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आला. त्यापाठोपाठ आढेचे सरपंच बाळासाहेब केदारी यांचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आपटी गेव्हंडे येथील ग्रामपंचायत सदस्य आनंद शिंगारे यांच्यावर खुनी हल्ला झाल्याने त्या वेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)>मावळात जमीन व्यवहारातून आर्थिक सुबत्ता आलेली आहे. एकत्र कुटुंबपद्धती इतिहासजमा होऊ लागली आहे. जमिनीचे तुकडीकरण वाढले. जमीन तुकड्याला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. सध्या युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. तालुक्यात विनापरवाना पिस्तूल वापरणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. ही बाबही चिंतनीय आहे. स्वस्तात आणि विनासायास पिस्तूल मिळत असल्याने तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही जण मध्य प्रदेश आणि बिहार यांसारख्या परराज्यांतून पिस्तुलांसह घातक शस्त्रांची आयात करत असल्याची चर्चा आहे.