शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या ताकीदमुळे जिल्ह्यातील चार जलमार्गांचा अखरे मार्ग सुकर

By सुरेश लोखंडे | Updated: January 12, 2018 20:14 IST

यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे.

लोकमत इंम्पॅक्ट !सुरेश लोखंडेठाणे : जलमार्गांचा विकास करण्याची ताकीद देऊन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख चार जलमार्गांसह ठिकठिकाणच्या जलवाहतुकीचा मार्ग सुकर केला आहे. यासाठी आधीच ‘ठाणे जिल्ह्यास जलमार्गांची प्रतीक्षा’या आशयाचे वृत्त लोकमतने २ जानेवारी रोजी प्रसिद्ध करून प्रशासनाला नूतन वर्षातील संकल्पाची जाणीव करून दिली होती. त्यास आता केंद्राचे पाठबळ मिळाल्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांनी दिलेल्या ताकीदमुळे जिल्हा यंत्रणा कामाला लागली आहे.राष्ट्रीय महामार्गांसह राज्य व मुख्य जिल्हामार्गांसह लोहमार्गांतील सततच्या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांसह ठाणेकर रोज मरणयातना भोगत आहेत. त्यात ध्वनी व वायुप्रदूषणामुळे दैनंदिन जीवन मेटाकुटीला आले आहे. या-ना-त्या कारणांमुळे होणारी सततची वाहतूककोंडी आणि प्रदूषणातून मुक्तता करणारे ठाणे जिल्ह्यातील जलमार्ग गांभीर्याने मार्गी लावणे लोकहिताचे असल्याचे लोकमतने प्रशासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून दिले आहेत. यामुळे लोहमार्गांवरील ताण कमी करणे शक्य होणार असून राष्ट्रीय महामार्गांप्रमाणेच ६३८ किमीच्या राज्यमार्ग व मुख्य जिल्हामार्गांवरील कोंडीदेखील जलमार्गामुळे कमी करणे शक्य होणार आहे. यासाठी प्रस्तावित सुमारे तीन हजार २५३ कोंटी खर्चाचे जलमार्ग मार्गी लावणे गरजेचे आहे.सर्वच महानगरांना लागलेले स्मार्ट सिटीचे वेध यामुळे जिल्ह्यातील महापालिकांकडे देशभरातील महानगरांच्या दळणवळणात सातत्याने वाढ होत आहे. या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसह नवी मुंबई महापालिका-एमएमआरडीए भलेमोठे दोन हजार ८०० कोटींचे दोन ब्रॉड जलमार्ग यातील पहिल्या टप्प्यातील वाशी ते ऐरोलीदरम्यानचा १२ किमी लांबीच्या जलमार्गास, त्यासाठी सुमारे दोन हजार ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याशिवाय, वाशीगाव येथून खाडीकिनाºयावरून कोपरखैरणे-घणसोली-गोठिवली-रबाळे-ऐरोली व दिघा हा जलमार्ग उपनगरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. वाशी ते ऐरोली व वाशी ते बेलापूरदरम्यानचा मार्गही त्वरित हाती घेण्याची गरज आहे.ठाणे महापालिकेच्या चार जलमार्गांसाठी ४५३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात सुमारे २८७ कोटी खर्च होणार आहेत. यामध्ये इंद्रासिटी रूट ते घोडबंदर रोड, कोलशेत, साकेत, दिवा हा जलमार्ग आहे. याशिवाय, ठाणे ते वसई, मीरा-भार्इंदर जलमार्ग, ठाणे ते भिवंडी, ठाणे ते डोंबिवली, कल्याण आदी चार जलमार्ग ठाणे मनपाने गांभीर्याने पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार