शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

धुक्यामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला , खोकला वाढला, श्वसनाच्या आजारांचा धोका वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 04:47 IST

गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये सतत चढ-उतार होत आहेत. ‘ओखी’ चक्रीवादळामुळे या आठवड्यात वातावरणात बदल झाला असून, शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे धुक्याची समस्या निर्माण झाली आहे. या विचित्र वातावरणामुळे नवी मुंबईकरांचा दम निघाला आहे. ज्यांना श्वसनविकार आहे, अशा रु ग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास त्रास, तर मुलांमध्ये रात्री खोकल्याची उबळ येण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.हवामानातील उष्मा, दमटपणा वाढतो, असे वातावरण खोकल्याच्या व घशाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या आजारांसाठी पोषक असते. गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानामध्ये चढ-उतार होत असल्याने धूळही मोठ्या प्रमाणात उडताना दिसत आहे. त्यामुळे संसर्गामुळे खोकला होण्याचे प्रमाण वाढेल असे श्वसनविकारतज्ज्ञांनी स्पष्ट केले. औद्योगिक वसाहतीमुळे जल व वायुप्रदूषण, वाढत्या गाड्यांमुळे वाहतूककोंडी व त्याचा आरोग्यावर होणारा जीवघेणा परिणाम ही जागतिक पातळीवरची गंभीर समस्या बनली आहे. दिवाळीत झालेल्या वायू व ध्वनिप्रदूषणाने तब्येत बिघडलेल्या नवी मुंबईकरांवर या वातावरणाचा अजून गंभीर परिणाम होणार असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.खारघर परिसराच्या जवळच तळोजा औद्योगिक वसाहत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा आहे. त्यामुळे येथे प्रदूषणाची समस्या तीव्र आहे. वारंवार तक्र ारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.धुळीचे प्रमाण ५६.२५%वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या वायुप्रदूषणाच्या अहवालानुसार सद्य:स्थितीत नवी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली असून, ६८.९४ टक्के नोंदविण्यात आली आहे. धूलिकणाचे प्रमाण सर्वाधिक असून श्वसनविकाराला कारणीभूत ठरणारे आहे. शहरात धुळीचे प्रमाण ५६.२५ इतके आहे, तर शुद्ध हवेचे प्रमाण केवळ ३१ टक्के इतके आहे.बदल शरीराला बाधकगेल्या संपूर्ण महिन्यात दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक गार वारे असा विचित्र बदल शरीराला बाधक ठरत आहे व या बदलामुळे दमा, सुका खोकला आणि रक्तदाब असे विकार नागरिकांमध्ये बळावले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ओखी’ वादळामुळे गेले दोन दिवस नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडला आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे मलेरिया, डेंग्यूतही वाढ होणार आहे.लक्षणे : श्वसनास अडथळा निर्माण होणे, डोळे चुरचुरणे, खाज येणे, घसा बसणे, नाकातून पाणी येणेहे करा : घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या, डोक्यावर टोपी घाला, रुमालाने चेहरा झाका, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल्स घाला, योग्य आहार व व्यायाम महत्त्वाचा

टॅग्स :pollutionप्रदूषणNavi Mumbaiनवी मुंबई