शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

पाढे न आल्याने मुलीचा पित्याच्या शिक्षेमुळे मृत्यू

By admin | Updated: July 13, 2016 03:42 IST

पाढे म्हणताना अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने चक्क बाजूला पडलेला कांदा उचलून चिमुरडीच्या तोंडात कोंबला. तो घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून तिचा करुण अंत झाला.

औरंगाबाद : पाढे म्हणताना अडखळल्यामुळे संतापलेल्या पित्याने चक्क बाजूला पडलेला कांदा उचलून चिमुरडीच्या तोंडात कोंबला. तो घशात अडकल्यामुळे श्वास गुदमरून तिचा करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना बीड बायपास रोडवरील बाळापुरात घडली. भारती कुटे (६) असे या चिमुरडीचे नाव आहे. ती जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होती. पिता राजू कुटे (३०) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती चिकलठाणा ठाण्याचे निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी दिली. राजू हा पत्नी अनुसया, मुलगी भारती व तीन वर्षीय मुलगा, आई सरसाबाई आणि भाऊ सचिन यांच्यासोबत राहतो. मोलमजुरी करून तो कुटुंबाची उपजीविका भागवीत होता. शनिवारी रात्री राजूने भारतीचा अभ्यास घेण्यास सुरुवात केली. त्याने तिला पाढे म्हणण्यास सांगितले. १२पर्यंत तिने बरोबर पाढे म्हटले. पण पुढे तिला काही आठवेना. राजूने अनेकदा दरडावून विचारल्यानंतरही तिला पुढचा पाढा म्हणता आला नाही. त्यामुळे राजू संतापला अन् त्याने बाजूला पडलेला मोठा कांदा उचलला व तो भारतीच्या तोंडात कोंबला. कांदा थेट घशात जाऊन अडकल्याने तिचा श्वास गुदमारला भारती तडफडू लागली. हे पाहून तिची आई अनुसया धावत आली. तिने आपल्या चिमुकलीच्या तोंडात अडकलेला कांदा काढण्याचा प्रयत्न केला; परंतु तो निघेना. काही क्षणातच भारतीची हालचाल मंदावली आणि ती बेशुद्ध पडली. आईने धावत जाऊन दिराला बोलावून आणले. मग तिला गाडीने कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये आणले. खेळता खेळता भारतीने कांदा गिळला, असे तिच्या घरच्यांनी हॉस्पिटलमध्ये सांगितले. डॉक्टरांनी तेथे तिला तपासून मृत घोषित केले आणि शवविच्छेदनासाठी प्रेत घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचे डॉक्टरांनी सांगितले.शवविच्छेदन टाळलेपोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून राजूने घडलेला प्रकार गावात सांगू नका, असे घरच्यांना बजावले आणि भारतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात नेण्याऐवजी थेट गावात रात्री परत आणला. रविवारी सकाळीच स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. (प्रतिनिधी)