शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धावण्याच्या अंतरात केली घट

By admin | Updated: January 13, 2016 01:28 IST

पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी

- डिप्पी वांकाणी, मुंबईपोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणीअंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुरुष उमेदवारांसाठी ५ कि.मी.वरून १,६०० मीटर, तर महिलांसाठी ३ कि.मी.वरून ८०० मीटर इतके अंतर कमी केले आहे. गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या वेळी धावताना चार युवकांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत शासनाने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी मात्र या निर्णयावर नापसंती व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ११ व १४ जून रोजी राहुल सपकाळ, प्रसाद माळी, अंबादास सोनवणे व विशाल केदार हे चार युवक पोलीस भरतीच्या वेळी ५ कि.मी. धावण्याची चाचणी देत असताना मरण पावले होते. उच्च न्यायालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शासनाने धावण्याचे अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. चार युवकांच्या मृत्यूचे प्रकरण विधानसभेतही उपस्थित झाले होते व त्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी व गृहखात्याचे प्रतिनिधी यांना या प्रकरणाची तपशीलवार छाननी करण्यास सांगण्यात आले होते. या गटाने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने वरील निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोलीस भरतीसाठी या आठवड्यात जाहिरात दिली जाणार असून प्रत्यक्ष भरती फेब्रुवारीत होईल. त्यांनी सांगितले की, अंतर कमी करण्याचा निर्णय माझ्या मतानुसार फार चांगला नाही. पोलीस दलात प्रत्यक्ष काम करताना जी क्षमता तरुण मुलांमध्ये असायला हवी त्यानुसार ५ कि.मी. अंतर फार नव्हते. काही वेळा तर पोलिसांना १४ तास बंदोबस्त करावा लागतो. अशा वेळी त्यांच्यात सहनशक्ती असावी लागते. एकाच वेळी लेखी परीक्षाएकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी परीक्षा देण्याचे टाळण्यासाठी आता पोलीस भरतीतील सर्व उमेदवारांची लेखी चाचणी राज्यभरात एकाचवेळी घेतली जाणार आहे. आतापर्यंत वेगवेगळया वेळी लेखी परीक्षा होत असे. त्यामुळे उमेदवार वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देऊन एक पर्याय निवडत असे. परिणामी बऱ्याच जागा रिकाम्या राहात.अभ्यास गटाच्या शिफारशीनुसार पोलीस भरती हिवाळ्यात घेण्यात यावी असे सुचविण्यात आले. याबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मुंबईत लाखावर युवक भर तीसाठी येतात. भरती प्रक्रिया फेब्रुवारीत सुरू झाली तरी मे अखेरपर्यंत ती चालणार. त्यामुळे हिवाळ्याची अट पाळली जाण्याची शक्यता कमी आहे.गेल्या वर्षी दुपारनंतर ही चाचणी घेतली गेली, त्यावेळी तापमानही खूप होते व आर्द्रताही जास्त होती. त्यावेळी कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन चार युवक कोसळले. पण आता शारीरिक चाचणी एकतर सकाळी वा सायंकाळी ४.३० नंतर घेण्याचा निर्णय झालेला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगातील सेवेसाठी पूर्वी स्वतंत्र पोलीस भरती होत होती. नव्या निर्णयानुसार आता स्वतंत्र न होता एकत्र प्रक्रियेतूनच तुरुंगासाठी पोलीस निवडले जातील.