शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदत नाकारल्याने नातलग संतप्त

By admin | Updated: August 2, 2016 03:46 IST

गैबीनगरात इमारत कोसळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदत नाकारल्याने परिसरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

भिवंडी : गैबीनगरात इमारत कोसळल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मदत नाकारल्याने परिसरातील नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सरकारने मदतीबाबत निर्णय घ्यायला हवा. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत द्यायला हवी, अशी भूमिका मृतांचे नातलग, जखमी आणि मित्र परिवाराने घेतली. इमारत धोकादायक होती, हे मान्य; पण माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत मिळायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली. मोहम्मद वकील अहमद म्हणाले, शहरातील दुर्घटनाग्रस्त इमारतीत माझी तीन मुले जखमी झाली आहेत. आम्ही बेघर झालो आहेत. सध्या मुलांवर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्यांकडून कपडे मागून आणून घालायची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने मदत करून आम्हास सहकार्य करावे.भिवंडी पालिकेने इमारत धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. सर्वतोपरी प्रयत्न करूनही भाडेकरूंनी आणि रहिवाशांनी तोडगा स्वीकारला नाही. त्यांंच्या हलगर्जीपणामुळे नाहक बळी गेले आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतींबाबतच पालिकेने कडक धोरण स्वीकारावे. परंतु, बेघर झालेल्यांना माणुसकी म्हणून मदत करावी, अशी भूमिका निसार अहमद यांनी मांडली.आणखी बळी जाऊ नयेत, म्हणून धोकादायक इमारती तत्काळ रिकाम्या करण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. तेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे मत अब्दुल गफार मोहम्मद इस्माईल यांनी व्यक्त केले. इमारत दुर्घटनेत मृत व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिकमदत मिळावी, असा आग्रह धरून मोहम्मद अली म्हणाले, अनधिकृत इमारती उभ्या राहण्यास मनपा प्रशासन अधिकारी व प्रभाग अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर कारवाई करा >आश्वासनानंतर जनाजाज्यांचे मृतदेह रविवारी रात्री ताब्यात आले, ते मिळाल्यानंतर परिसरात नागरिकांनी गर्दी केली. गैबीपीर कबरस्तानात सर्वांचा दफनविधी करण्यात आला. तत्पूर्वी मदत मिळावी, म्हणून दुर्घटनास्थळी जनाजा थांबवण्यात आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने दफनविधीसाठी जनाजे नेण्यात आले.