शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांच्या प्रसूती, क्षयरोगासाठीच्या भरपगारी रजेला मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:42 IST

राज्यभरातील निवासी डॉक्टर गेली अनेक वर्षे प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास रजा मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत.

मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर गेली अनेक वर्षे प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास रजा मिळावी यासाठी पाठपुरावा करत आहेत. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून निवासी महिला डॉक्टरांसाठीच्या प्रसूती तसेच क्षयरोगाच्या भरपगारी रजेला वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाने मान्यता दिली आहे.पदव्युत्तर शिक्षण घेत असताना निवासी डॉक्टरांना क्षयरोगाची लागण झाल्यास भरपगारी (विद्यावेतन) रजा मंजूर होत नसल्याचे निदर्शनास आले होते. नुकतीच निवासी डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षण विभागासोबत यासंदर्भात बैठक झाली. यावेळी निवासी डॉक्टरांच्या गैरहजेरीच्या काळात रुग्णसेवेसाठी बदलीने घ्यावयाच्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनासंदर्भातील आर्थिक तरतुदीला मंजुरी देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन आल्यास संबंधित विभागप्रमुख, अधिष्ठाता यांनी निवासी डॉक्टरांच्या भरपगारी रजेची शिफारस सात दिवसांच्या आत संचालनालयाकडे पाठवावी, असा निर्णय घेण्यात आला. या शिफारशीला १५ दिवसांच्या आत मंजुरीचे आदेश देण्यात येतील, असे या बैठकीत ठरल्याची माहिती निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी दिली. याचप्रमाणेच महिला निवासी डॉक्टरांच्या प्रसूती रजेविषयी प्रस्ताव मान्य करण्यात आल्याची माहितीही डॉ. चिरवटकर यांनी दिली.लवकरच परिपत्रक काढणारनिवासी महिला डॉक्टरांसाठीची प्रसूती तसेच क्षयरोग झाल्यास देण्यात येणारी भरपगारी रजा सुरूवातीला वैद्यकीय शिक्षण व संचालनालयाच्या स्तरावर मान्य करण्यात येईल. या निर्णयाविषयीचे परिपत्रक लवकरच काढण्यात येईल. मात्र, त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी जाईल, असे निवासी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेश चिरवटकर यांनी सांगितले.

टॅग्स :doctorडॉक्टरMedicalवैद्यकीय