ऑनलाइन लोकमतधाड (बुलडाणा), दि. 9 - ढालसावंगी येथे तलावातून पाणी उपसा करण्याच्या वादातून ८ फेब्रुवारी रोजी दुपारी एकाच समाजाच्या दोन गटांत हाणामारी झाली. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, परस्परविरोधी तक्रारी पोलिसात देण्यात आल्या आहेत.ढालसावंगी शिवारातील भिलंदरी तलावात तुळजाभवानी बहुउद्देशीय मासेमारी संस्थेतील सदस्यांनी रितसर परवाना पावती भरून तलावात मत्स्यबीज टाकले आहे. या तलावातून पाणी उपसा करण्यात येत आहे. सध्या पाण्याची स्थिती पाहता मत्स्यबीज वाढण्याच्या हेतूने मासेमारी संस्थेतील सदस्यांनी मदन साळुबा वाघ आणि १० जणांना तलावातून मोटार पंप टाकून पाणी उपसा करताना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे झालेल्या हाणामारीत बंडू वाघ, सदाशिव वाघ हे दोघे जखमी झाले.
धरणातून पाणी उपसा करण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी
By admin | Updated: February 9, 2017 18:33 IST