शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

निकालपत्रांमध्येही केला फेरफार

By admin | Updated: June 10, 2016 04:50 IST

अटकेत असलेला मास्टर मार्इंड मिथून मोरे याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रांमध्येही फेरफार केल्याची खळबळजनक घटना समोर आली

मुंबई : मुंबई विद्यापीठ पेपर घोटाळा प्रकरणात अटकेत असलेला मास्टर मार्इंड मिथून मोरे याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रांमध्येही फेरफार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ही बाब उघडकीस आली. मुंबई विद्यापीठात इंजिनीयरिंगच्या पेपरचा महाघोटाळा भांडुुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या पथकाने उघडकीस आणला. कोऱ्या उत्तरपत्रिका काढून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडविण्यासाठी देणाऱ्या या रॅकेटचा पोलखोल करत, भांडुप पोलिसांनी मिथुन मोरे, चिमण सोलंकी, संजय कुंभार, दिनकर म्हात्रे हे चौघे शिपाई, संदीप जाधव, रोहन मोरे हे कारकून आणि कस्टोडियन प्रभाकर वझे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणाचा शोध सुरु असताना यातील मास्टरमार्इंड मोरे याने विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्येही फेरफार केल्याचे उघडकीस आले. नापास असतानाही उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका बनवून देण्याचा प्रताप मोरेने केला आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अटक केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या चौकशीतून ही बाब उघड झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक विद्यार्थ्याला गणित विषयात १०० पैकी २८ गुण मिळाले होते. असे असतानाही त्यांनी उत्तीर्ण झाल्याची बनावट मार्कशिट तयार करुन पदवीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात सादर केली.संबंधित विद्यालयाने हे निकालपत्र विद्यापिठात तपासणीसाठी पाठवताच याचे बिंग फुटले. यामागे मोरेचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. याप्रकरणी विद्यापीठातील वरीष्ठांचाही हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)>अधिक तपास सुरुकामोठे पोलिसांसह भांडुप पोलिसांनी मोरेकडे कसून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी विद्यापीठातील वरीष्ठांचाही हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.