शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणांमुळे दुबार पेरणी, नुकसानभरपाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 20:31 IST

परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

लातूर : परभणी कृषी विद्यापीठाच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत विविध २१ कंपन्यांचे बियाणे उगवणशक्ती तपासणीमध्ये नापास झाले आहेत. तसा अहवालही विद्यापीठाकडून प्राप्त झाला असून, प्रशासनाने संबंधित कंपन्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, बोगस बियाणांमुळे शेतकºयांना मात्र दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुबार पेरणीची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी मनसेने केली असून, आंदोलनाचा इशाराही दिला आहे. लातूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र ६ लाख ४ हजार हेक्टर आहे. त्यापैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. उगवणशक्ती कमी असलेल्या सोयाबीनच्या बियाणांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांना त्याचा फटका बसला आहे. नव्हे, त्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान शेतक-यांचे आहे. शेतक-यांचे हे नुकसान कृषी विभाग, बियाणे कंपन्या व विक्रेत्यांचे साटेलोटे असल्यामुळेच झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. बियाणे विक्रीस आणण्यापूर्वी कृषी विभागाचे अधिकारी, गुणनियंत्रण विभागाने बियाणांची उगवण क्षमता तपासणे गरजेचे होते. मात्र कंपन्यांशी साटेलोटे असल्यामुळे उगवणक्षमता तपासली गेली नाही. कंपन्यांनी बाजारातील सोयाबीन खरेदी करून व त्याच्या बियाणे बॅगा तयार करून विक्रेत्यांच्या मदतीने शेतक-यांना विकल्या. अशा जवळपास २१ कंपन्यांचे नमुने परभणीच्या बीज परीक्षण प्रयोगशाळेत नापास झाले आहे. हे वाण कोणत्या कोणत्या शेतक-यांना विकले याची यादी विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याने त्या यादीनुसार सरसकट सर्व शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी. पेरणीच्या गडबडीत बियाणे न उगवलेल्या शेतक-यांना न उगवल्याची तक्रार करता आली नाही. त्यामुळे ज्या शेतक-यांची तक्रार आली नाही, त्यांनाही मदत करावी, अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शेतक-यांना फसविणा-या कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासकीय अधिका-यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशाराही जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, भागवत शिंदे, भास्कर औताडे, रवि सूर्यवंशी, बाळासाहेब मुंडे यांनी दिला आहे.