शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

व्यसनाधीनता पालकांमुळेच

By admin | Updated: May 30, 2015 01:08 IST

नोकरीच्या निमित्ताने पालक सतत घराबाहेर असतात. घरी आल्यानंतरही मुलांचा हक्काचा वेळ टीव्हीला दिला जात असल्यामुळे मुलांमध्ये कमालीची अस्वस्थता असते,

पुणे : नोकरीच्या निमित्ताने पालक सतत घराबाहेर असतात. घरी आल्यानंतरही मुलांचा हक्काचा वेळ टीव्हीला दिला जात असल्यामुळे मुलांमध्ये कमालीची अस्वस्थता असते, त्यातून मार्ग काढण्यासाठी मुले व्यसनांचा पर्याय अवलंबतात. मुलांच्या व्यसनाधीनतेला पालकच सर्वाधिक जवाबदार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने तंबाखूमुक्त जनजागृती अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. पांडुरंग बलकवडे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण, अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सायली कुलकर्णी उपस्थित होते. तेंडुलकर म्हणाले, ‘‘सध्या समाजात पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव जाणवत आहे. नोकरीवरून घरी आल्यानंतरही पालक टीव्हीमध्ये गुंतून राहतात. त्यामुळे त्यांचे मुलांशी असलेले नाते तुटत चालले आहे. खरेतर तोच वेळ मुलांना दिला तर मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आई-वडिल हे मुलांचे हक्क असतात. पालकांनी नुसता पैशाचा विचार करून चालणार नाही, तर पैशाइतकेच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आज मुलांप्रमाणेच मुलीही व्यसनाधीनतेच्या आहारी चालल्या आहेत.’’ (प्रतिनिधी)चारचौघात वेगळे दिसण्यासाठी व्यक्तिमत्त्व नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे असते. व्यसन करणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे, तर व्यसनाशिवाय आयुष्यात आलेल्या संकटांना सामोरे जाणे हा खरा पुरुषार्थ आहे. सशक्त देश घडवण्यासाठी तरुणांची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.- डॉ. अमोल कोल्हे कार्यक्षम तरुणांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाची धुरा आहे. व्यसनांच्या आहारी जाऊन कुटुंब आणि आयुष्य बरबाद करणाऱ्या तरुणांचा देशाला उपयोग नसल्याचे नमूद केले. - डॉ. सदानंद मोरे