मुख्यमंत्र्यांचे उद्योजकांना आवाहन : हिंगणा एमआयडीसी असो.चा वर्धापनदिननागपूर : पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी हिंगणा एमआयडीसी असोसिएशनच्या वर्धापनदिन समारंभात उद्योजकांना केले. मंचावर खासदार कृपाल तुमाने, असोसिएशनचे अध्यक्ष कॅप्टन सी.एम. रणधीर, उपाध्यक्ष जी.एल. निमा व सचिव चंद्रशेखर शेगावकर होते. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतूहलमुख्यमंत्री म्हणाले की, जगातील औद्योगिक वातावरण झपाट्याने बदलत आहे. भारताबद्दल जगातील उद्योगपतींना कुतुहूल आहे. आपल्या देशात गुंतवणूक करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. डावोस येथील जागतिक इकॉनॉमिक फोरमच्या सभेत मला हे चित्र जाणवले. जगातील उद्योजकांसोबत संवाद साधून गुंतवणूक वाढविण्याच्या प्रयत्नासोबतच देशातील उद्योजकांसोबत संवाद वाढविण्याचा प्रयत्न आहे. त्यातून ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘मेक इन महाराष्ट्र’ ही संकल्पना पूर्ण करण्यात येईल.कामगार कायदे सोपे करूउद्योग वाढीसाठी कामगार कायदे अडचणीचे ठरू नये, यासाठी सर्व समावेशक असा कामगार कायदा तयार करण्याचे प्रयत्न आहे. उद्योग आणि कामगारांच्या हिताचा सर्वसमावेशक धोरण असणारा कामगार कायदा असल्यास उद्योग वाढीसाठी त्याचा निश्चितपणे फायदा होतो. कुशल कामगार निर्मितीसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. उद्योगांमध्ये कशा प्रकारच्या कुशलतेची गरज आहे, याची वेळोवेळी शासनास माहिती दिल्यास त्या दिशेने प्रयत्न करता येईल. यासंदर्भातला मसूदा शासन तयार करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.प्रास्तविक भाषण असोसिएशनचे अध्यक्ष सी.एम. रणधीर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात हिंगणा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात कामगार काम करीत असल्यामुळे एक सुसज्ज रुग्णालय तसेच इतर मागण्यांचा उल्लेख केला. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर बेंद्रे व अमित पचेरीवाला, चंद्रशेखर शेगावकर, सहसचिव के.के. डागा व समीर खोसला, कार्यकारी सदस्य गणेश जयस्वाल, नारायण गुप्ता, एस.एम. पटवर्धन, अरुण लांजेवार, सचिन जैन यांच्यासह महिन्द्र अॅण्ड महिन्द्रचे प्रकल्प प्रमुख आशुतोष त्रिपाठी, राजकुमार चोखाली आणि उद्योजक उपस्थित होते.संचालन रेणुका देशकर यांनी केले. (प्रतिनिधी)उद्योग मित्र संकल्पना आवश्यकउद्योग जगतातील अडचणी सोडविण्यासाठी उद्योग मित्र ही संकल्पना आवश्यक आहे, पण केवळ त्या ठिकाणी न थांबता थेट शासनाशी संवाद केल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. प्रादेशिक अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. उद्योग उभारणीसाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योगपतींचा सत्कारउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी गोपाळ शिराळकर, आशुतोश दास आणि विनायक गान या उद्योगपतींचा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवाय एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष बसंतलाल शाह, डी.के. तापडिया, राजीव पांडे, एस. रामलिंगम, चंदर खोसला, एस.के. मित्रा आदींचा सत्कार करण्यात आला.
‘मेक इन विदर्भ’ची स्वप्नपूर्ती करा
By admin | Updated: February 2, 2015 01:12 IST