शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

नाले अडकले गाळात

By admin | Updated: May 30, 2016 01:58 IST

नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़

मुंबई : मान्सूनपूर्व कामांची मुदत संपण्यास अवघे ४८ तास उरले आहेत़ नाल्यांची सफाई, गाळाची विल्हेवाट, नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र पश्चिम व पूर्व उपनगरांपाठोपाठ शहर भागातील नाल्यांचीही थोड्याफार फरकाने तीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे़>वडाळ्यात डास आणि दुर्गंधीकोरबा मिठागर येथील सर्व नाल्यांमधील गाळ काढल्यानंतरही त्याची विल्हेवाट लावण्याचे काम धिम्या गतीने सुरूआहे़ नाल्याच्या तोंडावरच गाळ पडून असल्याने हा गाळ पावसाळ्यात पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका आहे़ नाल्यातील गाळाच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नाक मुठीत घेऊन राहावे लागते़ गाळामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे आरोग्यही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे़ वडाळा पूर्व येथील आदर्श रमाई नालाही कचऱ्याने भरलेला असतो़ त्यामुळे पावसाळ्यात भरतीच्या वेळी आसपासच्या परिसरात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे़, तर पारधीनगर नाल्याची हीच अवस्था आहे़>धारावीतील नाले तुंबलेले विभागांतर्गत नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत़ धारावी विभागांतर्गत नाले आजही गाळाने भरलेले आहेत़ धारावी क्रॉस रोडवरील अनेक वस्त्यांचे सांडपाणी या नाल्यात सोडले जाते़ त्यामुळे येथे कचरा साचलेला असतो़ परिणामी, नाल्यातील सांडपाणी वाहून जात नाही़ दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव हा त्रास येथेही आहे़ >माटुंगा लेबर कॅम्पदादर-माटुंगा-माहीमहून धारावी खाडीला जोडण्यात आलेला नाला कचऱ्याने भरलेला असतो़ माटुंगा लेबर कॅम्प नाल्यामध्ये सफाईनंतरही कचरा दिसून येतो़ त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती आहे़ या नाल्याच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडला होता़ तसेच जी उत्तर व जी दक्षिण या प्रभागात हा प्रस्ताव रखडल्यामुळे या कामाला विलंबच झाला़ >नाले उपनगरांतील असो अथवा शहरातील,सर्व ठिकाणी एकच समस्या प्रामुख्याने दिसून आली आहे़ नाल्यांची सफाई केल्यानंतरही स्थानिक रहिवासी नाल्यात कचरा टाकतात़ त्यामुळे नाला पुन्हा प्लॅस्टिक, बांधकामाचे साहित्य अशा टाकाऊ वस्तंूनी भरून जातो़ कुर्ला येथील श्रमजीवी नाला, मालाड येथील कुरार व्हिलेज आणि मालवणी नाला, गोवंडी येथील रफिकनगर नाला, अंधेरीचा मोगरा नाला, वांद्रे येथील बेहरामपाडा आणि एअरपोर्ट नाल्यांमध्ये स्थानिक रहिवासी कचरा टाकत असल्याचे पालिकेला दिसून आले आहे़ घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी नाल्यांच्या परिसरातील झोपडपट्टींसाठी कचऱ्याचे डबे बसविण्याची शिफारस केली होती़ या डब्यात नागरिकांनी कचरा टाकल्यास नाला साफ राहील, असा दावा या विभागाने केला होता़ मात्र हा पर्याय प्रशासनाने अमान्य केला़ वारंवार ताकीद देऊनही रहिवासी पालिकेला जुमानत नसल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ त्यानुसार नाल्यात कचरा टाकणाऱ्यांकडून २०० ते १००० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे़