शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नागेश्वर रेड्डी यांना यंदाचा धन्वंतरी पुरस्कार प्रदान

By admin | Updated: March 26, 2017 16:25 IST

एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांना रविवारी प्रतिष्ठेच्या ४४व्या धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 26 - प्रसिद्ध जठरांत्रमार्ग विकारतज्ज्ञ (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट) तसेच हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांना रविवारी प्रतिष्ठेच्या ४४व्या धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल धन्वंतरी फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. नागेश्वर रेड्डी यांना (ताजमहाल हॉटेल, मुंबई येथे) हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. बी. के. गोयल, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. लेखा आदिक-पाठक, डॉ जीवराज शहा, वैद्य सुरेश चतुर्वेदी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अलीकडच्या काळात निवासी डॉक्टरांना झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉक्टर रुग्ण संबंधांचा प्रश्न पुनश्च ऐरणीवर आला असल्याचे नमूद करून डॉक्टरांच्या रक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी बोलताना केले. डॉक्टर आणि रुग्णांचे नाते परस्पर विश्वासाचे असले पाहिजे, असे सांगताना डॉक्टरांनी रुग्णांशी तसेच त्यांच्या संबंधितांशी सहानुभूतिपूर्वक वागले पाहिजे, असे ते म्हणाले. कित्येकदा संवादाच्या अभावामुळे किंवा तुटक संवादामुळे डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात असे सांगून संवाद आणि रुग्णांप्रती सहानुभूती यातून विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकते असे त्यांनी सांगितले. या संदर्भात वैद्यकीय शिक्षणासोबत मानव्यशास्त्र हा विषय शिकविण्याबाबत देखील विचार व्हावा अशी त्यांनी सूचना केली.