शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बडेजावपणातून डोकावतोय आजही ‘हुंडा’

By admin | Updated: May 5, 2017 02:29 IST

लग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत

महेंद्र कांबळे / बारामतीलग्नापूर्वी अथवा लग्नानंतर हुंड्यासाठी विवाहितांचा छळ करण्याचा प्रकार कमी होत नसून वाढतच असल्याचे सामाजिक वास्तव पुढे येत आहे. काही दिवसांपूर्वी मराठवाडा येथील एका मुलीने हुंडा देऊ शकत नाही, बापाला त्यासाठी कर्ज काढावे लागू नये, यासाठी विहीरीत जीव दिला. या घटनेने राज्य हदरले. हुंडा घेणे आणि देणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, पारंपरिक रीतीरिवाज, बडेजावपणा मिरवण्याची सवय असलेल्या मंडळींची मानसिकता अद्याप बदलायला तयार नाही. सामाजिकदृष्ट्या हुंड्यासाठी होणारा स्त्रियांचा छळ ही बाब नक्कीच संवेदनशील आहे. आता यावर तरुणांनी चर्चा करण्यापेक्षा व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.हुंडा प्रथेच्याविरोधात अनेक सामाजिक संघटनांनी आतापर्यंत आवाज उठविला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातदेखील महापुरुषांनीदेखील या प्रथेला छेद देण्याचा प्रयत्न केला. परंतु, २१ व्या शतकातदेखील विवाहितांचा हुंड्यासाठी छळ केल्याच्या घटना कमी होत नसल्याचे बारामती पोलीस ठाण्यातून माहिती घेतली असता  दिसून येते. बारामती शहरातील युवक विपुल पाटील यांची ‘कुणाचा बैल विकायचा आहे का...’ ही सोशल मीडियावरील पोस्ट सर्वाधिक चर्चेची ठरली. पाटील यांनी तयार केलेली पोस्ट अशी आहे. काही दिवसांपूर्वी एका कृषिकन्येने आपल्या शेतकरी बापाला हुंड्याची झळ बसू नये, यासाठी आत्महत्या केली. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या सोशल मीडियावर अनेकांचे संदेश वाचले. अनेकांनी त्यामध्ये हळहळ व्यक्त केली आहे, हे वाचून मनाला एक प्रकारची झिरड आली.महाराष्ट्रात दरवर्षी हजारो बैल विकायला निघतात. आई-बाप आपल्या दिवट्याला सजवून धजवून लग्नाच्या बाजारात उभा करतात. त्यांचे सरासरी दर पुढीलप्रमाणे असतात. डॉक्टर : १० लाख, सरकारी अधिकारी : १५ लाख, सरकारी नोकर : ५ लाख, अभियंता : ३ लाख, परमनंट शिक्षक : ३ लाख अशी पाटील यांनी पोस्ट तयार केली आहे. युवकांमधून ही पोस्ट सर्वाधिक व्हायरल केली जात आहे.अ‍ॅड. प्रियांका काटे यांनी सांगितले, की आजही हुंडा घेण्याची मानसिकता प्रत्येक समाजात दिसून येते. हुंडा केवळ पैशातच घेतला जातो, असे नाही. तर पैशांबरोबरच वस्तू, दागिने, वाहन आदींची मागणी वधू कुटुंबीयांकडे केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास वधूचा मानसिक, शारीरिक पातळीवर छळ केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. सुशिक्षित परिवारामध्येदेखील हे प्रकार घडतात. त्यातून विवाहितेच्या आत्महत्येपर्यंत प्रकार घडतात. अनेकदा रीतीरिवाज सांभाळण्यासाठी हुंडा घेतला जातो. वास्तविक विवाह करताना मुलगी तिचे घरदार सोडून पतीकडे येते. तिची हुंडा मागून वस्तूप्रमाणे किंमत करणे योग्य नाही.बारामती येथील स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख अंजली वाघमारे म्हणाल्या, की हुंडा मागणी करण्याचे प्रमाण सध्या ७० ते ८० टक्के आहे. केवळ हुंंडा शब्दाचा अर्थ मात्र बदलला आहे. हुंड्याऐवजी घर बांधण्यासाठी पैसे, पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे, पतीला वाहन घेण्यासाठी पैशांची अनेकदा मागणी केली जाते. मागणी पूर्ण न झाल्यास विवाहितेला मारहाण केली जाते, छळ केला जातो. स्त्री आधार केंद्राकडे तक्रार आल्यानंतर पती-पत्नी दोघांच्या कुटुंबीयांना बोलाविले जाते. दोन्ही कुटुुंबातील सदस्यांबरोबर चर्चा आणि पती-पत्नींचे समुपदेशन याद्वारे संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर कौटुंबिक वाद संपुष्टात येतो. मात्र, वाद न सुटल्यास कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला जातो, असे वाघमारे म्हणाल्या.सर्वधर्मीय वधू-वर सूचक मंडळाचे समन्वयक मंगेश इंगळे यांनी सांगितले, की मंडळाच्या वतीने नातेसंबंध जुळविण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजची तरुण पिढी उच्चशिक्षित होण्यासाठी प्राधान्य देते. चांगले करिअर घडविताना मुला-मुलींचे विवाहाचे वय ओलांडून जाते. त्यातून विवाह करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींचे वय वाढले आहे. त्यामुळे ऐच्छिक स्थळ मिळत नाही. त्यासाठी वधू-वर सूचक मंडळाची मदत घेतली जाते. हुंडा घेण्यापेक्षा मुला-मुलींनी त्यांचे आयुष्य चांगल्या पद्धतीने जगावे, अशी मानसिकता असणाऱ्या पालकांची संख्या अधिक आहे, असे इंगळे यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. ज्या पद्धतीने छेडछाडीच्याविरोधात पोलीस कार्यरत असतात. महाविद्यायलीन तरुणींना मार्गदर्शन करतात. त्याच पद्धतीने नवविवाहितांचादेखील छळामुळे जीव जाऊ नये, यासाठी त्या मुलीच्या पालकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले.हुंड्यासाठी छळ : सामाजिक संकटबारामती शहर पोलीस ठाण्यात मागील वर्षी महिलांच्यासंदर्भात २४ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या २ नवविवाहित महिलांनी आत्महत्या केल्या, तर दोघींनी छळाला कंटाळून पोलिसांत फिर्याद दाखल केली. २०१७ मध्ये ५ महिन्यांतच छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या ३ विवाहित आहेत, तर ११ महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून फिर्याद दाखल केली. ही एका पोलीस ठाण्याची आकडेवारी आहे. त्यामुळेच याची तीव्रता एक सामाजिक संकट म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे.