शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

सभापती जाणणार डोंबिवलीच्या व्यथा!

By admin | Updated: June 29, 2016 03:06 IST

महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे.

कल्याण : महापालिका प्रशासनाकडून डोंबिवलीला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आहे. आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात येतात. मात्र, महापौर राजेंद्र देवळेकर यांना त्यांच्याच घोषणेचा विसर पडला आहे. त्यामुळे महापौर गेले कुणीकडे?, असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. परंतु, आता जुलैपासून स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी स्थायीच्या बैठकीच्या दिवशी दुपारी या कार्यालयात बसण्याचा निर्णय घेतला आहे.डोंबिवली विभागीय कार्यालयांतर्गत ग, फ, ह आणि ई प्रभाग आहेत. डोंबिवलीसाठी पूर्णवेळ उपायुक्त नेमावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत आहे. परंतु, आजतागायत ती पूर्ण झालेली नाही. २०१०च्या निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पूर्णवेळ उपायुक्त नेमण्याची घोषणा तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी केली होती. मात्र २०१५ निवडणूक होऊनही याची अंमलबजावणी झालेली नाही. जे उपायुक्त नेमले जातात, ते डोंबिवलीला फिरकतही नाहीत. त्यामुळे डोंबिवलीतील नागरिकांना समस्या मांडण्यासाठी कल्याणला महापालिकेचे मुख्यालय गाठावे लागते. त्यामुळे आयुक्त रवींद्रन दरमहिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी डोंबिवली कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतात. परंतु, त्या दिवशी महासभा अथवा अन्य काही महत्त्वाचे काम आल्यास तेही डोंबिवलीत येत नाहीत. महापौरपदी निवडून आल्यानंतर राजेंद्र देवळेकर यांनी डोंबिवली दौऱ्यात महिन्यातून एक दिवस डोंबिवलीत येऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या अगोदर महापौर कल्याणी पाटील यांनीही असा दावा केला होता. परंतु, कालांतराने त्यांनी त्याचा विसर पडला. तोच कित्ता देवळेकर गिरवत आहेत. (प्रतिनिधी)>दुपारी ३ च्या सुमारास भेटणारडोंबिवलीला कोणी वाली नसल्याने आता गायकर येथील नागरिकांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. स्थायी समितीची बैठक ते सकाळी ११ वाजता घेणार आहेत. ती आटपून दुपारी ३ च्या सुमारास ते डोंबिवली विभागीय कार्यालयात उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, एकंदरीत यापूर्वीचा अनुभव पाहता अन्य पदाधिकाऱ्यांप्रमाणेच त्यांनीही केलेला दावा कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शहरातील समस्या गंभीर : पदाधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांनी शहराला दाखविलेली पाठ पाहता येथील अधिकारी आणि बेफीकीर झाले आहेत. यात फेरीवाला, अतिक्रमण, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहेत. शहर स्वच्छतेचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.