शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:57 IST

Double Voter List: मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

Maharashtra Local Body Election 2025:  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधी मतदार याद्या पारदर्शक करा अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यात दुबार मतदारावरून विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाने मोठं पाऊल उचललं आहे. राज्यात ज्या मतदार याद्या आहेत त्यात जे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार केले जातील. या मतदारांची ओळख पटवली जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषदा,४२ नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यावेळी पत्रकार परिषदेत दिनेश वाघमारे म्हणाले की, जिथे संभाव्य दुबार मतदार असतील त्यांच्या नावासमोर डबल स्टार असेल. हा मतदार कुठल्या केंद्रावर मतदान करेल त्याची नोंद केली जाईल. आमच्याकडे एक टूल आहे त्याआधारे संभाव्य मतदारांच्या नावासमोर डबल स्टार करण्यात आले आहेत. दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं त्यांनी सांगितले.

कशी असेल नवी मोहीम?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात येते. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत याबाबत त्यांच्याकडून नोंद घेतली जाईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्या दुबार मतदाराने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर या मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

मतदारांसाठी नवीन मोबाईल APP

मतदारांना मतदार यादीत नाव शोधणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी नवीन मोबाईल APP विकसित केले आहे. मोबाईल APP च्या माध्यमातून मतदारांना आपल्या नावाबरोबरच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्रेही दाखल करावी लागतात. त्यातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारीविषयक पार्श्वभूमी, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिक समजू शकते. ही माहितीसुद्धा या APP पमधून मिळू शकेल.

महत्वाच्या तारखा

नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात - १० नोव्हेंबर २०२५नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर २०२५नामनिर्देशनपत्रांची छाननी १८ नोव्हेंबर २०२५अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मदुत- २१ नोव्हेंबर २०२५अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर २०२५मतदानाचा दिवस - ०२ डिसेंबर २०२५मतमोजणीचा दिवस - ०३ डिसेंबर २०२५

 

English
हिंदी सारांश
Web Title : Double Star for Duplicate Voters: Maharashtra Election Commission's Initiative

Web Summary : Maharashtra Election Commission will mark potential duplicate voters with double stars in voter lists. This initiative aims to identify and register voters at a single polling center, ensuring fair local elections. Voters can use a new mobile app to easily find their names and polling place.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदानLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकElectionनिवडणूक 2024