शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

डोर्लेवाडीला विद्यार्थ्याचा शाळेतच मृत्यू

By admin | Updated: July 15, 2017 01:30 IST

(ता. बारामती) येथील खासगी प्राथमिक विद्यालयात चक्कर आल्याचे निमित्त होऊन शालेय विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कडोर्लेवाडी : (ता. बारामती) येथील खासगी प्राथमिक विद्यालयात चक्कर आल्याचे निमित्त होऊन शालेय विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. या घटनेमुळे डोर्लेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.डोर्लेवाडी येथील संत तुकाराम महाराज प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी (दि. १४) इयत्ता ७ वी मध्ये शिकणारा ओंकार सुनील देवकाते हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत आला. आज सकाळी १० वाजता तो शाळेत आला. दुपारी शाळेत १५ आॅगस्टची तयारी, सराव सुरू होता. मात्र, घसा खराब असल्याने त्याने त्या सरावामध्ये सहभाग घेतला नाही. या वेळी दुपारी पावणेएक वाजता तो एका वर्गातून दुसऱ्या वर्गात निघाला होता. यादरम्यान दुसऱ्या वर्गात जाताना तो विद्यार्थी चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला बारामतीमध्ये लगेच रुग्णालयात आणण्यात आले. या वेळी त्याची डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणीनंतर आेंंकार याचा उपाचारापूर्वीच मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. त्याच्या मृत्यूचे कारण अजून समजले नाही.त्याचे वडील सुनील देवकाते यांनी सांगितले, की गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता. या आजारपणातून आज त्याला थोडे बरे वाटत होते. त्यामुळे त्याला शाळेत पाठविले. आमच्या नशिबाने आमच्यावर ही वेळ आली आहे. माझी याबाबत कोणतीही तक्रार नाही. जे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, त्यांना घेऊ द्या, त्यांना काही अडचण येऊ देऊ नका, याबाबत माझी पत्रकारांना विनंती आहे.दरम्यान, मागील ३ महिन्यांपूर्वीदेखील याच शाळेतील चैत्यन्या मासाळ या विद्यार्थिनीचा शाळेच्या स्कूल बसखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर चौथ्या महिन्यात ही दुर्दैवी घटना घडली. ओंकार याच्या मृत्यूमुळे पुन्हा आज ही शाळा चर्चेत आली आहे. झारगडवाडी परिसरात आज या विषयावर तर्कवितर्कांना उधाण आले होते.