शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आत्मक्लेश यात्रा मंत्रालयाच्या दारात

By admin | Updated: May 30, 2017 04:53 IST

केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत २२ मेपासून सुरू झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली. सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असे आव्हान शेट्टी यांनी सरकारला दिले. सात-बारा कोरा करा, कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा आदी त्यांच्या मागण्या आहेत. पुण्याच्या फुले वाड्यापासून १९० किलोमीटरचा प्रवास यात्रेने केला आहे. राजू शेट्टी यांच्या सौरभ या मुलाला आज उष्णतेमुळे चक्कर आली. आधी सरकारचा पाठिंबा काढून शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढावी, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. १ जूनला संप होणारचमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तरच इतर मागण्यांबाबत चर्चेसाठी मुंबईत जाऊ, अन्यथा नाही. पुणतांबा येथे येऊन मुख्यमंत्र्यांनी संपकरी शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे सांगत किसान क्रांती समिती व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला. त्यांनी १ जूनपासून संपाची तयारी चालवली आहे.संघर्ष यात्रेने प्रश्न सुटणार नाहीतसरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. केवळ संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यात पत्रकारांना सांगितले. मुंबई हादरवूमोदी सध्या बाहुबली चित्रपटातील ‘बल्लाळ देव’ बनले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची स्वप्ने धुळीस मिळवली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर आम्ही ‘एनडीए’त आलो. मात्र, आमचा भ्रमनिरास झाला. आंदोलनात २५ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. आम्ही मुंबई हादरवून सोडू.- खा. राजू शेट्टीराज्यपालांनी दिली वेळ राज्यपाल विद्यासागर राव यांनी शेट्टी यांना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भेटीची वेळ दिली आहे.