शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

‘भाटघर’चे स्वयंचलित दरवाजे उघडले

By admin | Updated: September 18, 2016 00:39 IST

पावसामुळे धरणातून पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांपैकी २२ दरवाजांतून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे

भोर : तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून पाणी खाली सोडण्यासाठी बसविलेल्या धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांपैकी २२ दरवाजांतून १० हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. मागील ८ ते १० वर्षांत एका महिन्याच्या कालावधीत धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून तिसऱ्यांदा पाणी बाहेर सोडण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय नलावडे व शाखा अभियंता सदाशिव देवडे यांनी सांगितले. भोरमधील ब्रिटिशकालीन भाटघर धरण १३ आॅगस्टलाच १०० टक्केभरले. धरणात २३ हजार ५५२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (२४ टीएमसी) आहे. धरण भागातील भुतोंडे खोऱ्यात आज ६० मिमी, तर एकूण ३५०० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे आज दुपारी २.३० वाजता भोंगा वाजवून नागरिकांनाा सतर्क करून धरणाचे २२ स्वयंचलित दरवाजातून सुमारे ८६०० क्युसेक्सने पाणी बाहेर पडत आहे. यापूर्वी ९ आॅगस्टला धरण ९७ टक्के भरले होते. त्या वेळी २० हजार ४०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर १३ आॅगस्टला धरण १०० टक्केभरल्याने ८७०० क्युसेक्सने पाणी सोडले होते. आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने धरणाच्या २२ स्वयंचलित दरवाजातून पाणी खाली सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. >नीरा देवघरही भरले : ७९३७ क्युसेक्सने पाणी सोडलेभाटघर धरणाला ४५ स्वयंचलित आणि ३६ रोलिंगचे असे एकूण ८१ दरवाजे आहेत. यातून प्रतिसेकंदाला ५६ हजार ७०० वेगाने एकावेळी पाणी बाहेर पडते. भाटघर धरण गतवेळी ७० टक्केच भरले होते. मात्र, या वेळी एक महिना अगोदरच १०० टक्केभरले आहे.नीरा देवघर धरण १०० टक्के भरले असून धरणात ११ हजार ९१५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा (१२ टीएमसी) आहे. आजपासून सुरू झालेल्या पावसामुळे शिरगाव भागात ८९ मिमी, तर एकूण ४९४४ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे धरणाच्या पावरहाऊसमधून ७९३८ क्युसेक्सने व नदीपात्रात १ हजार ७५९ क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.