शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

‘दलित’ शब्द वापरास मनाई; शासनाकडून आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:46 IST

अमरावती येथील पंकज मेश्राम यांच्या लढ्याला यश

अमरावती : अनुसूचित जातीच्या संबोधनासाठी सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये आता ‘दलित’ शब्द वापरता येणार नाही. त्याऐवजी पर्यायी शब्दप्रयोग करावा, असे आदेश राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज दिले. अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी ‘दलित’ शब्दप्रयोग हद्दपार व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ११४/२०१६ दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ‘दलित’ शब्दाऐवजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार नमूद अनुसूचित जातीच्या संबोधनाकरिता सर्व व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र आदी कागदपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत ‘शेड्यूल्ड कास्ट’ व अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दप्रयोग करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासनाने ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजीत ‘शेड्यूल्ड कास्ट, न्यू बौद्ध’ तर मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध’ अशा संबोधनाचा वापर करावा, असे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी शासनादेशाद्वारे स्पष्ट केले आहे. 

अखेर शासनाने ‘दलित’ शब्द वापरास मनाई केली आहे. हा शब्दप्रयोग करू नये, असे संविधानात नमूद आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याचे समाधान आहे.- पंकज मेश्राम, याचिकाकर्ता, अमरावती