शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टेंशन नही लेनेका...आपण पासच; साडेचार लाख आजी-आजोबांच्या पेपर तपासणीचे काम सुरू

By अविनाश साबापुरे | Updated: March 20, 2024 13:30 IST

बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरली जाणार असल्याचीही माहिती

अविनाश साबापुरे, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: गत रविवारी राज्यात प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेण्यात आली, तर परीक्षेनंतर लगेचच केंद्र शासनाने उत्तीर्णतेचे निकष शिथिल केले. १५० पैकी पूर्वी ५१ गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक होते; परंतु सुधारित निकषानुसार आता ४९.५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण केले जाणार आहे. तसेच यापेक्षाही कमी गुण असणाऱ्या प्रौढांना अनुत्तीर्ण असा शेरा न देता ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा असलेले गुणपत्रक दिले जाणार आहे.

नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी १७ मार्च रोजी महाराष्ट्रात ३६ हजार परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेत तब्बल चार लाख ५६ हजार ७४८ प्रौढांनी हजेरी लावली. ही उपस्थिती उल्लास ॲपवरील नोंदणीच्या ७४.०३ टक्के होती. उत्तीर्णतेसाठी पूर्वी वाचन, लेखन व संख्याज्ञान या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १७ गुणांची अट देण्यात आली होती, तर एकूण १५० पैकी ५१ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक होते. आता सुधारित निकषानुसार या तिन्ही भागांमध्ये प्रत्येकी ५० पैकी १६.५ गुण, तर एकूण ४९.५ गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहे. पेपर तपासणीचे काम सुरू झाले असून, सुधारित निकषाबाबत योजना शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर यांनी निर्देश जारी केले आहेत. सुधारित निकषानुसारच उत्तरपत्रिका तपासणी व निकाल जाहीर होणार आहे.

बोलीभाषेतील उत्तरेही ग्राह्य धरणार

  • नवभारत साक्षरतेच्या परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणी आणि गुणदानाबाबत केंद्र शासनाने सुधारित निकष दिले.
  • त्यानुसार, प्रौढांनी प्रमाणभाषेऐवजी आपल्या बोलीभाषेत उत्तरे लिहिली असतील, तरी त्यांना गुणदान करण्याच्या सूचना आहेत. 
  • तसेच उत्तीर्ण होण्यासाठी ३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण पडत असल्यास ५ ग्रेस गुण दिले जाणार आहेत.
  • यानंतरही कोणी अनुत्तीर्ण होत असल्यास त्यांना ‘सुधारणा आवश्यक’ असे गुणपत्रक दिले जाणार आहे.

हे अभियान सन २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यामुळे राज्यातील असाक्षरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आत्ताच्या परीक्षेत ज्यांना बसता आले नाही त्यांना येणाऱ्या सप्टेंबर किंवा मार्चच्या परीक्षेस बसता येईल.- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना)

टॅग्स :examपरीक्षा