शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाप काढू नका; अन्यथा भूकंप! एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2022 05:23 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मालेगाव येथील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (जि. नाशिक) : गद्दारी कोणी केली, विश्वासघात कोणी केला, आम्ही कोणालाही पळवून नेले नाही. दिवस-रात्र मेहनत करून शिवसेना मोठी केली. आमचे आई-बाप काढू नका, धर्मवीर आनंद दिघे यांचा स्वर्गवास ही माझ्यासाठी सगळ्यात दु:खद घटना होती, धर्मवीर  दिघे यांच्या जीवनाविषयी ज्यादिवशी बोलेल त्यादिवशी राज्यात मोठा भूकंप होईल, असा इशारा शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मालेगाव येथील जाहीर सभेत दिला. 

शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी व काँग्रेससोबत सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मग विश्वासघात कोणी केला? बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली? मुंबई बॉम्बस्फोटाचे कनेक्शन असणाऱ्यांसोबत संबंध कोणी ठेवले? पन्नास आमदारांनी अन्यायाविरोधात बंडखोरी नाही तर उठाव, क्रांती केली आहे. याची जगातील ३३ देशांनी दखल घेतली आहे. एवढा मोठा उठाव का झाला याच्या मुळाशी जावे. आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जात आहे. मात्र, जनतेने आम्हाला स्वीकारले असल्याचे या विराट गर्दीवरून दिसून येत आहे. आम्ही कोणाच्या विरोधात गेलो नाही. हिंदुत्व सोडलेले नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडणूक लढवली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी काम करीत आहोत. गेल्या अडीच वर्षांत सेनेच्या आमदारांचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यामुळेच टोकाची पावले उचलली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

पोलिसांसमोर अनेक अडचणी आहेत. त्यांच्य जुन्या वसाहती आहेत. लिकेजेस आहेत, प्लॅस्टर पडत आहे. त्यांच्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणाही एकनाथ शिंदे यांनी केली. 

टॅक्सी, रिक्षाचालकांसाठी महामंडळराज्यातील टॅक्सी व रिक्षाचालक, तसेच हॉकर्सधारक यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. याचे काम युद्धपातळीवर सुरू केले जाईल. त्यासाठी त्याची जबाबदारी माजी कृषिमंत्री दादा भुसे व माजी मंत्री उदय सामंत यांच्यावर देण्यात येईल. लोकांसाठी सरकार आहे.  पुढच्या निवडणुकीत शिवसेना भाजपचे दोनशे आमदार निवडून येतील, असा दावाही शिंदे यांनी केला.

जिल्हानिर्मितीसाठी शासन सकारात्मकमाजी कृषिमंत्री दादा भुसे व पदाधिकाऱ्यांनी सभेत मालेगाव जिल्हानिर्मितीची मागणी लावून धरत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते.  यावर शिंदे यांनी जिल्हानिर्मितीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. मुंबईत  मंत्रालयात बैठक लवकरच घेऊन यावर निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीसांना केले ‘पंतप्रधान’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस वसाहतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताना एकनाथ शिंदे यांच्या तोंडी चुकून पंतप्रधान देवेंद्र फडणवीस असे नाव घेतले गेले. मात्र, लगेच त्यांनी आपली चूक सुधारली. यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा प्रोटोकॉल कमी करा, असे आपण डीजींना सांगितले असल्याचेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे