शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपकऱ्यांवर २२ मार्चपर्यंत कारवाई नकाे! हायकोर्टाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 06:39 IST

समितीचा अहवाल स्वीकारणार की नाही यावर निर्णय घेतला का? राज्य सरकारला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून त्रिसदस्यीय समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारणार की नाही, असा सवाल करत हायकोर्टाने शुक्रवारी सरकारला २२ मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच आजपासून २२ मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर  शिस्तभंगाची कारवाई करू नका, असेही निर्देश कोर्टाने दिले.

मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने या अहवालाचे काय केले, अशी विचारणा करताच सरकारी वकिलांनी सांगितले की, मंत्रिमंडळाने हा अहवाल विधानसभेत मांडायला सांगितला. अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य मिळून अशी एक समिती स्थापण्यात आली. या समितीने परिवहन मंत्र्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. मात्र, परिवहन मंत्र्यांनी काही दिवसांची मुदत मागितल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले. अहवाल स्वीकारणार की नाही, यावर मंत्रिमंडळाने निर्णय घेतला का, अशी विचारणा खंडपीठाने केली. 

शिस्तभंगाची कारवाई करू नकाn अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने  अहवालाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. मंत्रिमंडळाची बैठक २२ मार्चला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच निर्णय घेऊ, असे सरकारी वकिलांनी हायकोर्टाता सांगितले.n कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात सांगितले की, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करत आहे. त्यावर हायकोर्टाने २२ मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाला दिले.

एसटीचे शासनात विलिनीकरण व अन्य मागण्यांसाठी कर्मचारी ऑक्टोबरपासून संपावर आहेत. मागण्यांबाबत विचार करण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार सरकारने त्रिसदस्यीय समितीही नेमली. या समितीने काही दिवसांपूर्वी कोर्टात अहवाल सादर केला. सरकारनेही विलिनीकरणाची मागणी वगळता बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. 

टॅग्स :ST Strikeएसटी संप