शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘विधिमंडळ समित्यांची बदनामी होऊ देऊ नका’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:23 IST

या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

 मुंबई : विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी व्हावे यासाठी कार्यरत असलेल्या ३० संसदीय समित्यांच्या कामकाजाचा प्रारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनात करण्यात आला. या समित्यांची बदनामी होणार नाही, उलट त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय मिळेल याची काळजी घ्या, अशा कानपिचक्या फडणवीस यांनी यावेळी दिल्या. 

फडणवीस म्हणाले की, काही वर्षांपूर्वी या समित्यांची खूप बदनामी झाली होती. जिथेही काही समित्यांचे अध्यक्ष, सदस्य जायचे तिथे घबराट असायची. काही मागण्या केल्या गेल्या आणि त्यातूनही मोठी बदनामी झालेली होती. समित्यांच्या आड ब्लॅकमेल केले जात असल्याच्या तक्रारीदेखील झाल्या होत्या. मात्र, नंतर कारभारात बरीच सुधारणा झाली. या समित्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले जाऊ शकतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. समित्यांमध्ये जे सदस्य प्रभावीपणे काम करतात त्यांची कामे सरकार दरबारी अडत नाहीत, उलट ती लवकर होतात.  

सभापती, अध्यक्षांनी दौऱ्यांबाबत ठरवावे विधिमंडळ समित्यांचे परदेशातही दौरे आयोजित करण्याची मागणी आज झाली आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्षांनी त्या बाबत निर्णय घ्यावा, सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. 

विधिमंडळ समित्या या कामकाजाचा आत्मा विधिमंडळाच्या समित्या या विधिमंडळ कामकाजाचा आत्मा आहेत. या समित्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करून विधिमंडळाला आणि सरकारलाही उत्तरादायी करता येते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसState Governmentराज्य सरकार