शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:38 IST

Ajit Pawar : पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.

ठळक मुद्दे'कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या'

मुंबई : राज्यात कोरोनासंदर्भात कठोर निर्णय घेण्याची वेळ शासनावर आणू नका, याकरिता नियमांचे पालन करा, असे अवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. 

पनवेल येथील न्हावा शेवा टप्पा 3 पाणी पुरवठा योजनेच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते. लॉकडाऊनमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला जाते. रोजंदारीवरील कामगारांना चूल पेटवता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. 

याचबरोबर, भविष्यात पाण्यासाठी युद्ध होणार आहेत. अनेक राज्यात पाण्याचे वाद झाले आहेत. हे वाद जिल्हा, तालुका, गावात पोहोचले आहे. पाण्याचा थेंब साठविणे गरजेचे आहे. पाणी जीवन आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना पाण्याचे महत्व पटवून दिले पाहिजे. लोकांना जल साक्षर करण्याची आता वेळ आली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करा, लॉकडाऊनची वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही अजित पवार म्हणाले.

"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे"जग कितीही पुढे गेले तरी पाणी बनवता येत नाही, हे सत्य आहे. विकास, उद्योग हवा आहे. मात्र जीव घेणा विकास नको. संकटाना आपणच आमंत्रण देत आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याचबरोबर, कोरोनाच्या संकट आल्यावर लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी खालावली होती. ही चांगली बाब आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रदूषण वाढत चालले आहे. स्वातंत्र्य 75 वर्षांनंतरही पिण्याचे पाणी आपण देऊ शकत नसल्यास खूप वाईट आहे. मंगळावर पाणी शोधण्यपेक्षा जमिनीवर प्रदूषण शोधा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारpanvelपनवेल