शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानाला नाही ‘अर्जाची’ आडकाठी

By admin | Updated: June 9, 2016 01:13 IST

नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही.

पुणे : एखादी व्यक्ती गेली, तरी तिने पूर्वी नेत्रदानासाठी अर्ज केला होता, याचा कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि अर्ज भरला तरी कुटुंबीयांची परवानगी असल्याशिवाय नेत्रदान होऊ शकत नाही. म्हणूनच आता कुटुंबीयांना मृत व्यक्तीचे नेत्रदान करायची इच्छा असेल, तर त्यांनीच डॉक्टरांशी संपर्क साधून ६ तासांच्या आत डोळे नेत्रपेढीकडे सुपूर्त केले, तर दुसरा जीव ही सुंदर सृष्टी बघू शकणार आहे. यासाठी अर्ज भरण्याची कोणतीच आडकाठी राहिलेली नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य डॉ. बबन डोळस यांनी सांगितले. उद्या (दि. १०) जागतिक दृष्टिदान दिन आहे, त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत. आज विविध गणेश मंडळांसह अनेक संघटनांच्या माध्यमातून नेत्रदानासंबंधी अर्जांचे वाटप केले जाते आणि ते भरून घेतले जातात. मात्र, या अर्जांचा डेटा जतन करून ठेवला जात नाही. शासकीय स्तरावरही या अर्जांची कोणतीच माहिती उपलब्ध नाही आणि मुळातच त्या अर्जांना कायदेशीर आधार नाही. कुणीही व्यक्ती नंतर त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी त्याने नेत्रदानासंबंधी अर्ज भरल असेल, तर त्याचा डेटाच उपलब्ध नसल्याने त्या अर्जाला काहीच अर्थ राहत नाही, असे पुणे नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सदस्य व ग्लोबल व्हिजन फाउंडेशन नेत्रपेढीचे संस्थापक डॉ. बबन डोळस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. >केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आजमितीला संपूर्ण देशभरात वर्षभरात १ लाख नेत्रांची गरज भासत असून, महाराष्ट्रात हा आकडा ३० ते ४० हजारच्या आसपास आहे. मात्र, राज्यात नेत्रदात्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असून, दर वर्षी केवळ ३,००० दातेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी तयार होत आहेत.