शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

वैद्यकीय प्रवेशात डोमिसाइल घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 05:40 IST

स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्यक्षात परराज्यांमधील असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील १

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थानिक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कोट्यातून वैद्यकीय प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्यक्षात परराज्यांमधील असलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील १५ वर्षांच्या वास्तव्याचा बोगस ‘अधिवास दाखला’ (डोमिसाइल सर्टिर्फिकेट) सादर केल्याचे उघड झाल्याने, स्थानिक विद्यार्थी आणि पालक चिंतित झाले आहेत. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशांची पहिली यादी २५ जुलै रोजी प्रसिद्ध व्हायची आहे. त्यामुळे प्रशासनाने या फसवणुकीची त्या आधी संपूर्ण कसून चौकशी करून, एकही पात्र स्थानिक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करावी, असा आग्रह विद्यार्थी व पालकांनी धरला आहे.वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता यावी, म्हणून देश पातळीवर ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली. मात्र, या प्रक्रियेतही विद्यार्थ्यांनी घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ८५ टक्के कोट्यात वर्णी लावण्यासाठी दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गोवा, गुजरात इत्यादी राज्यांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ राज्याबरोबर महाराष्ट्रातूनही खोटा ‘अधिवास दाखला’ देऊन अर्ज भरल्याचे, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने जाहीर केलेल्या यादीवरून स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शासकीय महाविद्यालयांत ३,५०० व शासकीय अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांत सुमारे दीड हजार जागा अशा तब्बल पाच हजार जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवासी आहे, त्या राज्यातील ८५ टक्के कोट्यात तो अर्ज भरू शकतो. त्याचबरोबर, अन्य राज्यात त्याला प्रवेश घ्यायचा असल्यास, तो १५ टक्के ‘आॅल इंडिया’ कोट्यात अर्ज भरू शकतो. प्रत्येक राज्याने विद्यार्थ्यांच्या नावाच्या याद्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत. या याद्यांची पडताळणी केल्यावर, महाराष्ट्रात अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी दुसऱ्या राज्यांमध्येही अर्ज भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ‘नीट’ परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाचे दरवाजे देशभर खुले झाले असले, तरी त्याचाही लबाडीने दुरूपयोग केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र राज्याच्या यादीतून जवळपास ४०० विद्यार्थ्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. कारण त्यांनी खोटी ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ दिल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही.- डॉ. प्रवीण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयकठोर तपासणीची पालकांची मागणीदेशात मेडिकलच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्याने, स्थानिकांच्या ८५ टक्के कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या राज्याबरोबरच महाराष्ट्राचा खोटा अधिवास दाखला घेऊन अर्ज भरल्याचे पालकांचे म्हणणे आहे.राज्यातून दहावी पास न झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या कठोर तपासणीची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.