शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीला कॉर्पोरेट लूक?

By admin | Updated: August 4, 2016 01:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील विभागीय कार्यालयाचा लवकरच पुनर्विकास केला जाणार आहे. महापालिकेच्या स्वनिधीतून हा विकास करणे अशक्य असल्याने खासगीकरणातून हे काम करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत येथील प्रभाग कार्यालयांचेही विकेंद्रीकरण केले जाणार आहे. एकंदरीतच कॉर्पाेरेट लूक लाभणाऱ्या नव्या वास्तूत बहुमजली वाहनतळ उभारण्याचाही प्रस्ताव आहे. महासभेच्या मान्यतेनंतरच या कार्यवाहीला प्रारंभ होणार आहे.केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय हे रेल्वे स्थानकानजीक अतिशय गजबजलेल्या ठिकाणी आहे. सध्या रेल्वे स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करता या जागेचा वापर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी करण्याच्या दृष्टीने या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाची स्थापना होण्यापूर्वी या जागेवर अस्तित्वात असलेल्या इमारतीत तत्कालीन डोंबिवली नगरपालिका व कालांतराने महापालिकेचे डोंबिवली विभागीय कार्यालय म्हणून वापर होऊ लागला. प्रभाग क्षेत्रांची निर्मिती झाल्यानंतर डोंबिवली पूर्वेकडील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्रांसाठी याच कार्यालयाचा सध्या वापर होत आहे. दरम्यान, जागेचे महत्त्व व महापालिका प्रशासकीय कामकाजाची सोय व विभागीय कार्यालयाचे विकें द्रीकरण करण्यासाठी संबंधित ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्र कार्यालये त्या त्या प्रभाग क्षेत्रांत मध्यवर्ती ठिकाणी स्थापन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘फ’ प्रभागाचे कार्यालय पी. पी. चेंबर, तर ‘ग’ प्रभागाचे कार्यालय गांधीनगर येथे हलवण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. विभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करताना मुख्य वास्तूत सुसज्ज वाहनतळ उभारण्यात येणार आहे. येथे सरकारी आणि खासगी कार्यालयांसाठीही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांना वाहनतळाचा फायदा होईल, त्याचबरोबर सुनियोजित वास्तू उभारल्यास शहराच्या सुशोभीकरणात भर पडेल. (प्रतिनिधी)>सध्या दोन शाळा, विभागीय कार्यालयसध्या महापालिका विभागीय कार्यालयाच्या भूखंडावर के. बी. वीरा शाळा व महापालिकेच्या शाळेची इमारतही आहे. याव्यतिरिक्त उर्वरित जागेवर डोंबिवली विभागीय कार्यालयाची इमारत आहे. या एकत्रित भूखंडाचे क्षेत्रफळ अंदाजे ६५६९.२० चौरस मीटर इतके आहे. >खाजगीकरणातून प्रकल्प उभारणे सोयीचेविभागीय कार्यालयाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो खासगीकरणाद्वारे केला जाणार आहे. सध्या महापालिकेकडील आर्थिक स्थितीचा विचार करता हा प्रस्तावित प्रकल्प महापालिकेला स्वनिधीतून उभारणे कठीण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या जागेचा मूलभूत आणि आर्थिकदृष्ट्या योग्य प्रकारे वापर करण्यासाठी खासगीकरणातून हा प्रकल्प उभारणे सोयीस्कर असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. धोरणात्मक निर्णयासाठी येत्या महासभेत हा प्रस्ताव दाखल होणार असल्याने त्याला लोकप्रतिनिधींची कितपत पसंती मिळेल, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.