शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

श्वानांना त्वचारोगाची लागण

By admin | Updated: September 20, 2016 02:10 IST

सध्या शहरात भटकणाऱ्या श्वानांना त्वचारोगसदृश आजाराची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे.

तळवडे : सध्या शहरात भटकणाऱ्या श्वानांना त्वचारोगसदृश आजाराची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे. अंगावरील केस गळून गेलेले, त्वचा लालसर व कोरडी पडल्यामुळे सारखे अंग खाजवणारे श्वान जागोजागी दिसत आहेत. शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये शहर परिसरातील कचऱ्याचे ढीग कारणीभूत ठरत आहेत. नागरिकांनी टाकलेल्या अन्नावर भटकी कुत्री पोसली जात असल्याने दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. संख्या वाढल्याने टोळक्या-टोळक्यांनी भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर बऱ्याच वेळा आणीबाणीचे प्रसंग बेतले आहेत. अलीकडील काही दिवसांमध्ये काही कुत्र्यांच्या अंगावरील केस गळून त्वचा लाल झालेली आहे. त्यातच अंगाला खाज सुटली आहे. अशा प्रकारच्या त्वचारोगाचा प्रादुर्भाव झालेली कुत्री ठिकठिकाणी दिसून येत आहेत. सध्याचा काळ हा श्वान प्रजातीच्या प्रजननाचा हंगाम असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्याने या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे अशक्त झालेली कुत्री एकतर आडोशाला किंवा जागा मिळेल तेथे पडून असतात. काही कुत्री त्याच ठिकाणी गतप्राण झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे त्यांच्या या आजाराचा इतर प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच श्वानांची संख्या वाढू नये यासाठी निर्बिजीकरणासारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविली जावी, अशी मागणी सजग नागरिक करीत आहेत. अशा आजारांनी ग्रस्त असलेली कुत्री किंवा इतर प्राणी मानवी वस्तीच्या परिसरात आढळल्यास महापालिकेशी संपर्क करावा. त्या कुत्र्यांना तसेच प्राण्यांना संगोपन केंद्रात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातील, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे. (वार्ताहर)शहरात सध्या मोकाट कुत्र्यांना विविध प्रकारचे सांसर्गिक कातडीचे आजार, तसेच विविध प्रकारची विषाणुजन्य खरुज झाल्याचे दिसून येते. सदर कातडीचे आजार अथवा खरुज हे सूक्ष्म, अतिसूक्ष्म, बुरशीजन्य परोपजीवी (गोचिड, पिसवा इत्यादी) कोटी अथवा जीवाणूंमुळे होतात. तसेच पावसाळ्यात बहुतेक कुत्र्यांना पचनाचे विकार आढळून येतात. त्यामुळे कुत्र्यांना रक्ताचे जुलाब, उलट्या झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सांसर्गिक आजार असल्यामुळे मानव, तसेच इतर प्राण्यांना ते होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा आजारांनी ग्रस्त कुत्र्यांचा संपर्क टाळावा. औषधे, पावडर यांची फवारणी करावी. तसेच पाळीव प्राण्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घ्यावे. - डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी,पिंपरी-चिंचवड महापालिका