शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या स्टेथोस्कोपने पित्याने केली मृत चिमुकल्याची तपासणी

By admin | Updated: April 21, 2017 20:47 IST

काही मिनिटांपूर्वीच आपल्याकडे नजरभरून पाहणारा चिमुकला आपल्याला असा सोडून जाऊ शकत नाही. काही तरी चुकते असे म्हणत पित्याने

 संतोष हिरेमठ/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 21 -  घाटी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार घेणाऱ्या चिमुकल्याने जगाचा निरोप घेतल्याचे डॉक्टरांनी सांगितले; परंतु काही मिनिटांपूर्वीच आपल्याकडे नजरभरून पाहणारा चिमुकला आपल्याला असा सोडून जाऊ शकत नाही. काही तरी चुकते असे म्हणत पित्याने सरळ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप घेतला आणि मुलाच्या हृदयाची धडधड ऐकण्याचा प्रयत्न केला. मुलाने ईहलोकाचा निरोप घेतल्याचे लक्षात आल्याने पित्यावर आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला.घाटी रुग्णालयात गुरुवारी मन हेलावणारा प्रसंग पाहून अनेकांचे डोळे भरून आले. वढव (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथील रामप्रसाद थोरात (शास्त्री) यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा रोहितला रविवारी घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पाच रुपयांत मिळणारे थंडपेय पिण्यात आल्यानंतर रोहितची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यास प्रारंभी शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु या ठिकाणी उपचाराच्या सुविधा नसल्याच्या कारणाने त्यास घाटीत दाखल करण्यात आले. त्याच्यावर  ट्रॉमामध्ये उपचार सुरू होते. व्हेटिंलेटरवर असलेला रोहित आज सकाळी सगळ्यांकडे बघत होता. आवाजाला प्रतिसाद देत होता. आनंदाच्या भरात रामप्रसाद थोरात यांनी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरणही केले; परंतु दुपारी अचानक रोहितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टररांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला, असे होऊ शकत नाही, असे म्हणत रामप्रसाद थोरात यांनी सरळ डॉक्टरांच्या गळ्यातील स्टेथोस्कोप घेतला आणि रोहितच्या छातीला लावला. तेव्हा मात्र त्यांना त्याच्या मृत्यूचे सत्य पचवावे लागले.एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. डॉक्टरांनी मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही थोरात यांनी केला. रोहित दाखल झाला तेव्हाच प्रकृती गंभीर होती. त्याविषयी कल्पना देण्यात आली होती,असे डॉक्टरांनी सांगितले. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्यासंदर्भात कोणीही तक्रार दिली नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले. उपचाराकडे दुर्लक्षकाही वेळापूर्वी माझ्याकडे पाहणाऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याचा विश्वास बसला नाही. त्यामुळे स्वत: स्टेथोस्कोपने तपासले. मुलाच्या उपचाराकडे दुर्लक्ष झाले. उपचाराकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी अनेक लोकप्रतिनिधींनी डॉक्टरांना सूचना केली; परंतु तरीही डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचे रामप्रसाद थोरात म्हणाले.