शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

कट प्रॅक्टिसविरोधात डॉक्टरांचा एल्गार

By admin | Updated: April 8, 2017 01:23 IST

वैद्यकीय क्षेत्रात सध्या निराशा दाटून आली असून, या पेशाविरोधात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे

पुणे : वैद्यकीय क्षेत्रात सध्या निराशा दाटून आली असून, या पेशाविरोधात अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. वैद्यकीय सेवेतील बाजारूपणा आणि चुकीच्या प्रवृत्तींमुळे नागरिक आणि डॉक्टरांमधील अविश्वासाची दरी वाढत आहे. या स्थितीत बदल करण्यासाठी चांगला व्यवसाय करणारे डॉक्टर आणि नागरिक यांनी एकत्र आले पाहिजे, असा सूर व्यक्त करीत डॉक्टरांनीच वैद्यकीय क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींविरोधात एल्गार पुकारण्याची शुक्रवारी हाक दिली. पुणे सिटीझन डॉक्टर फोरमची व ६६६.ेी्िरें्र३१ं.ङ्म१ॅ या संकेतस्थळाचे उद््घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर उत्तम वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची नावे देण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांकडूनच अभिप्राय मागविण्यात आले आहेत. अ‍ॅड. असिम सरोदे, डॉ. अरुण गद्रे, डॉ. अनंत फडके, डॉ. श्रीराम गीत, ज्येष्ठ पत्रकार आनंद आगाशे या वेळी उपस्थित होते. समाजाची नैतिकता आज अल्पसंख्याक झाली आहे. पैसा आणि गुंडगिरीचीच अरेरावी आहे. वैद्यकीय क्षेत्रात आज जे निराशेचे वातावरण आहे, त्याची सुरुवात यापूर्वीच झाली आहे. पूर्वी रुग्ण आणि डॉक्टरांचा परस्परांवर विश्वास होता. आज चंगळवादी वृत्तीने हा विश्वास नाहीसा झाला आहे. विश्वासाचे हे वातावरण वाढावे यासाठी स्थानिक पातळीवर विश्वास वाढायला हवा. त्यासाठी सरकारी धोरणेदेखील बदलायला हवीत. आरोग्यावर अधिक खर्च केला पाहिजे. चुकीच्या कारणांमुळे वैद्यकीय क्षेत्र चर्चेत आहे. मात्र, इतर व्यवसायांप्रमाणेच यात चांगले, वाईट आणि कुरूप प्रवृत्ती आहेत. मात्र, नकारात्मक वृत्तांमुळे त्याचा संपूर्ण व्यवसायावर परिणाम होतो. डॉक्टरांनी आपल्या पेशाविषयी एक जाड पडदा निर्माण केल्यास त्यांच्याविषयी गैरसमजच अधिक होतील. काही रुग्णालये एकाच शस्त्रक्रियेचे विमा असेल तर वेगळे बिल आणि नसेल तर वेगळे बिल लावतात. असे कसे होते? अशा स्वरूपाचे अनेक अनुभव रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना येत असतात, असे आगाशे म्हणाले. डॉक्टरांनाच आपल्या क्षेत्राविषयी अधिक माहिती असते. त्यांनाच दुष्कृत्य करणाऱ्यांची माहिती सर्वांच्या आधी होत असते. त्यामुळे साहजिकच त्याविरोधात लढण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच येते, असे अ‍ॅड. सरोदे म्हणाले. (प्रतिनिधी)वैद्यकीय सेवा बाजारात उभी डॉक्टरांना होत असलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील निराशा वाढली आहे. त्यामुळे वैद्यकीय पेशा एक व्रत म्हणून करणारे डॉक्टरदेखील, आपल्याला कधीही मारहाण होऊ शकते, अशा भीतीदायक वातावरणात वावरत आहेत. डॉक्टरांवर विश्वास राहिला नसल्याने अशी स्थिती झाली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्र बाजारात उभे राहिल्यासारखी स्थिती आहे. गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी डॉक्टर आणि नागरिकांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, असे डॉ. अरुण गद्रे यांनी सांगितले.