शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

डॉक्टर्स डे विशेष : उपचार पद्धतीनुसार बनतो ‘डॉक्टरांचा स्वभाव’

By admin | Updated: July 1, 2016 11:30 IST

‘आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते.’ ‘औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात, पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसºया चेहःयाकडे पाहूनच मिळते.’ अनेकांनी हा अनुभव घेतला असेल.

पूजा दामले : मुंबई 
‘आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते.’ ‘औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात, पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसºया चेहःयाकडे पाहूनच मिळते.’ अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. 
गेल्या काही वर्षात फॅमिली डॉक्टरांबरोबरच स्पेशलाईज डॉक्टरांची संख्या वाढत आहे. थोडा आजार वाढला की स्पेशलाईज डॉक्टरला कन्सल्ट केले जाते. पण, डॉक्टरांच्या स्पेशलायझेशनप्रमाणे त्यांच्या वागण्या-बोलण्यातही फरक  दिसून येतो. डॉक्टरांमधील हे फरक सहज लक्षात येण्यासारखे आहेत. प्रत्येक डॉक्टरला हे लागू होईलच, असे नाही. पण, बहुतांश डॉक्टरांची ही वैशिष्ट्ये तुम्ही टिपू शकाल. डॉक्टरर्स डे निमित्त डॉक्टरांच्या उपचार पद्धतीनुसार त्यांची वैशिष्ट्ये कशी बदलतात. रुग्णालयात, दवाखान्यात येणाºया व्यक्तींशी ते कशा पद्धतीने बोलतात याविषयी नोंदविलेली ही काही निरीक्षणे : 
 
स्त्रीरोग तज्ज्ञ (गायकॉलॉजॉस्टि)
स्त्रीरोग तज्ज्ञ या नावातच त्यांच्याकडे येणाºया रुग्णांचे स्वरुप स्पष्ट होते. महिला रुग्ण आणि गर्भवती महिला या डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे मातृत्व, वात्सल्याची भावना या डॉक्टरांच्या बोलण्यातून अधिक दिसून येते. या डॉक्टरांचे बोलणे  हळुवार असते. महिलांशी योग्य पद्धतीने हे डॉक्टर संवाद साधतात. महिलांशी संवाद साधत असल्यामुळे अन्य  व्यक्तींशी संवाद साधताना ते त्याचपद्धतीने मृदू भाषेत संवाद साधताना दिसतात. 
 
लहान मुलांचे डॉक्टर (पिडियाट्रिक्स)
लहान मुलांचे डॉक्टर हे सर्व डॉक्टरांपेक्षा वेगळे असतात. कारण, दरदिवशी हट्टी, शांत, खोडकर, सतत वळवळ करणाºया, कोणोचही न ऐकणाºया अशा विविध मुलांशी त्यांना संवाद साधायचा असतो. त्यामुळे हे डॉक्टर प्रेमळ आणि वेळेला कडक वागणारे असतात. समोर ज्या पद्धतीचे मुल असेल त्याप्रमाणे हे डॉक्टर स्वत:च्या बोलण्या वागण्यात बदल करतात. लहान मुलांचे लाडके डॉक्टर होण्यासाठी हे डॉक्टर अनेक स्किल स्वत:मध्ये विकसित करतात. पण, याचा परिणाम असा होतो की, अनेकदा मोठ्या व्यक्तींशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात लहान मुलांचा खोडकरपणा, मिश्किलपणा यांच्यामध्येही उतरलेला पाहायला मिळतो. 
 
अस्थिव्यंग तज्ज्ञ (आॅर्थोपेडिक) 
या डॉक्टरांचा रुबाबच वेगळा असतो. या डॉक्टरांच्या कामाचे स्वरुप हे थोडे राकट असे असते. कारण, हाड मजबूत तर शरीर मजबूत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हाड तुटल्यावर ते जोडणे, हाडांमध्ये काही दुखापत झाल्यावर हळुवार काम केले, तर चालत नाही. त्यामुळे हे डॉक्टर ‘रफ-टफ’ असतात. या डॉक्टरांशी बोलताना मृदुपणा दिसून येतच नाही. कारण, हळुवार बोलल्यास रुग्ण त्यांचे ऐकणारच नाही. त्यामुळेही या डॉक्टरांना असे बोलण्याची सवयच लागते. या डॉक्टरांना हाडाला जास्त इजा होऊ नये म्हणून कमी वेळात हाडे जागेवर बसवणे, जोडणे आवश्यक असते. त्यामुळे आॅर्थोपेडिक्स डॉक्टरांची निर्णय क्षमता अधिक आणि वेगवान असते. हे डॉक्टर तुमच्याशी प्रेमाने हळुवार बोलणार नाहीत. त्यांच्या चालण्याबोलण्यातून, वावरण्यातून हा वेगळेपणा सहज टिपता येण्यासारखा आहे. 
 
त्वचारोग तज्ज्ञ (डर्मटलॉजिस्ट)
या डॉक्टरांचा संबंध त्वचेशी म्हणजेच सौंदर्याशी आणि नाजूकपणाशी आहे. सौंदर्याशी या डॉक्टरांचा संबंध येत असल्यामुळे या डॉक्टरांचे राहणीमान नेहमीच टापटिप असते. अन्य डॉक्टरांपेक्षा कपड्यांबाबत, दिसण्याबाबत हे डॉक्टर अधिक काटेकोर असतात. हे डॉक्टर सहसा घाईत आणि पटापट बोलताना आढळत नाही. शांतपणे हळुवार बोलतात. रुग्ण समोर नसतानाही हे डॉक्टर अत्यंत हळुवार बोलतात, यांच्या चालण्या बोलण्यातून मृदुता आढळून येते. 
 
मानसोपचारतज्ज्ञ (सायक्रॅटिस्ट)
मानसोपचारतज्ज्ञ नेहमीच शांत आणि आनंदी असतात. कोणत्याही परिस्थितीत हे पटकन रागवत नाहीत किंवा प्रतिक्रियाही देत नाहीत. मानसोपचारतज्ज्ञ ज्या रुग्णांवर उपचार करतात, त्या रुग्णांना डॉक्टरांवर विश्वास बसणे महत्त्वाचे असते. त्यामुळे हे डॉक्टर विश्वास संपादन करण्यात माहिर असतात. समोर रुग्ण नसतानाही अन्य व्यक्तींशी संवाद साधताना ते शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घेतात (अथवा तसा अभिनय तरी करतात.) हे डॉक्टर सर्व व्यक्तींशी त्यांच्या शैलीत संवाद साधू शकतात. एका व्यक्तीशी बोलतात, त्याचप्रमाणे दुसºया व्यक्तीशी संवाद साधतील असे नाही. 
 
जनरल मेडिसिन
जनरल मेडिसीनचे डॉक्टर बोलताना तर्कशुद्ध पद्धधतीने बोलतात. समाजात काम केले असल्यामुळे या डॉक्टरांचे संभाषण कौशल्य चांगले असते. संशोधनवृत्ती आणि तर्कशुद्धता यांच्या बोलण्यातून दिसून येते. अभ्यासपूर्ण गोष्टी बोलण्याकडे या डॉक्टरांचा भर असतो.