शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

डॉक्टर्स डे विशेष; उपचार पद्धतीनुसार बनतो डॉक्टरांचा स्वभाव

By admin | Updated: July 1, 2016 02:06 IST

आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते. औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात

पूजा दामले,

मुंबई- आमच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना पाहूनच मला खूप बरे वाटते. औषधे ही शारीरिक आजारांना बरे करतात, पण मानसिक स्वास्थ्य हे डॉक्टरांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहूनच मिळते.ह्ण अनेकांनी हा अनुभव घेतला असेल. गेल्या काही वर्षात फॅमिली डॉक्टरांबरोबरच स्पेशलाईज डॉक्टरांची संख्या वाढत आहे. थोडा आजार वाढला की स्पेशलाईज डॉक्टरला कन्सल्ट केले जाते. पण, डॉक्टरांच्या स्पेशलायझेशनप्रमाणे त्यांच्या वागण्या-बोलण्यातही फरक दिसून येतो. डॉक्टरांमधील हे फरक सहज लक्षात येण्यासारखे आहेत. प्रत्येक डॉक्टरला हे लागू होईलच, असे नाही. पण, बहुतांश डॉक्टरांची ही वैशिष्ट्ये तुम्ही टिपू शकाल. डॉक्टरर्स डे निमित्त डॉक्टरांच्या उपचार पद्धतीनुसार त्यांची वैशिष्ट्ये कशी बदलतात. रुग्णालयात, दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तींशी ते कशा पद्धतीने बोलतात याविषयी नोंदविलेली ही काही निरीक्षणे : स्त्रीरोग तज्ज्ञ (गायकॉलॉजॉस्टि)स्त्रीरोग तज्ज्ञ या नावातच त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचे स्वरुप स्पष्ट होते. महिला रुग्ण आणि गर्भवती महिला या डॉक्टरांकडे येतात. त्यामुळे मातृत्व, वात्सल्याची भावना या डॉक्टरांच्या बोलण्यातून अधिक दिसून येते. या डॉक्टरांचे बोलणे हळुवार असते. महिलांशी योग्य पद्धतीने हे डॉक्टर संवाद साधतात. महिलांशी संवाद साधत असल्यामुळे अन्य व्यक्तींशी संवाद साधताना ते त्याचपद्धतीने मृदू भाषेत संवाद साधताना दिसतात. लहान मुलांचे डॉक्टर (पिडियाट्रिक्स)लहान मुलांचे डॉक्टर हे सर्व डॉक्टरांपेक्षा वेगळे असतात. कारण, दरदिवशी हट्टी, शांत, खोडकर, सतत वळवळ करणाऱ्या, कोणोचही न ऐकणाऱ्या अशा विविध मुलांशी त्यांना संवाद साधायचा असतो. त्यामुळे हे डॉक्टर प्रेमळ आणि वेळेला कडक वागणारे असतात. समोर ज्या पद्धतीचे मुल असेल त्याप्रमाणे हे डॉक्टर स्वत:च्या बोलण्या वागण्यात बदल करतात. लहान मुलांचे लाडके डॉक्टर होण्यासाठी हे डॉक्टर अनेक स्किल स्वत:मध्ये विकसित करतात. पण, याचा परिणाम असा होतो की, अनेकदा मोठ्या व्यक्तींशी बोलतानाही त्यांच्या बोलण्यात लहान मुलांचा खोडकरपणा, मिश्किलपणा यांच्यामध्येही उतरलेला पाहायला मिळतो. अस्थिव्यंग तज्ज्ञ (आॅर्थोपेडिक) या डॉक्टरांचा रुबाबच वेगळा असतो. या डॉक्टरांच्या कामाचे स्वरुप हे थोडे राकट असे असते. कारण, हाड मजबूत तर शरीर मजबूत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे हाड तुटल्यावर ते जोडणे, हाडांमध्ये काही दुखापत झाल्यावर हळुवार काम केले, तर चालत नाही. त्यामुळे हे डॉक्टर ह्यरफ-टफह्ण असतात. या डॉक्टरांशी बोलताना मृदुपणा दिसून येतच नाही. कारण, हळुवार बोलल्यास रुग्ण त्यांचे ऐकणारच नाही. त्यामुळेही या डॉक्टरांना असे बोलण्याची सवयच लागते. या डॉक्टरांना हाडाला जास्त इजा होऊ नये म्हणून कमी वेळात हाडे जागेवर बसवणे, जोडणे आवश्यक असते. त्यामुळे आॅर्थोपेडिक्स डॉक्टरांची निर्णय क्षमता अधिक आणि वेगवान असते. हे डॉक्टर तुमच्याशी प्रेमाने हळुवार बोलणार नाहीत. त्यांच्या चालण्याबोलण्यातून, वावरण्यातून हा वेगळेपणा सहज टिपता येण्यासारखा आहे. त्वचारोग तज्ज्ञ (डर्मटलॉजिस्ट)या डॉक्टरांचा संबंध त्वचेशी म्हणजेच सौंदर्याशी आणि नाजूकपणाशी आहे. सौंदर्याशी या डॉक्टरांचा संबंध येत असल्यामुळे या डॉक्टरांचे राहणीमान नेहमीच टापटिप असते. अन्य डॉक्टरांपेक्षा कपड्यांबाबत, दिसण्याबाबत हे डॉक्टर अधिक काटेकोर असतात. हे डॉक्टर सहसा घाईत आणि पटापट बोलताना आढळत नाही. शांतपणे हळुवार बोलतात. रुग्ण समोर नसतानाही हे डॉक्टर अत्यंत हळुवार बोलतात, यांच्या चालण्या बोलण्यातून मृदुता आढळून येते. मानसोपचारतज्ज्ञ (सायक्रॅटिस्ट)मानसोपचारतज्ज्ञ नेहमीच शांत आणि आनंदी असतात. कोणत्याही परिस्थितीत हे पटकन रागवत नाहीत किंवा प्रतिक्रियाही देत नाहीत. मानसोपचारतज्ज्ञ ज्या रुग्णांवर उपचार करतात, त्या रुग्णांना डॉक्टरांवर विश्वास बसणे महत्त्वाचे असते. त्यामुळे हे डॉक्टर विश्वास संपादन करण्यात माहिर असतात. समोर रुग्ण नसतानाही अन्य व्यक्तींशी संवाद साधताना ते शांतपणे सर्व गोष्टी ऐकून घेतात (अथवा तसा अभिनय तरी करतात.) हे डॉक्टर सर्व व्यक्तींशी त्यांच्या शैलीत संवाद साधू शकतात. एका व्यक्तीशी बोलतात, त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधतील असे नाही. जनरल मेडिसिनजनरल मेडिसीनचे डॉक्टर बोलताना तर्कशुद्ध पद्धधतीने बोलतात. समाजात काम केले असल्यामुळे या डॉक्टरांचे संभाषण कौशल्य चांगले असते. संशोधनवृत्ती आणि तर्कशुद्धता यांच्या बोलण्यातून दिसून येते. अभ्यासपूर्ण गोष्टी बोलण्याकडे या डॉक्टरांचा भर असतो.