शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

डॉक्टरांनी सुरक्षेसाठी ‘पोलीस अ‍ॅप’ वापरावे

By admin | Updated: August 4, 2016 01:45 IST

गेल्या काही वर्षांत डॉक्टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध बदलेले आहेत.

मुंबई : गेल्या काही वर्षांत डॉक्टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध बदलेले आहेत. डॉक्टरांवर हल्ले होतात, पण डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गरज पडल्यास ‘पोलीसिंग महाराष्ट्र’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन आहे. यावर सर्व हेल्पलाइन्स उपलब्ध आहेत, डॉक्टर याची मदत घेऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले. शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शासकीय दंत महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी दीक्षित यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार, प्र. सहसंचालक सुरेश बारपांडे, निवेदक प्रदीप भिडे उपस्थित होते. शासकीय दंत महाविद्यालयाचे नाव व परंपरा लक्षात घेता या महाविद्यालयाने देशातील विविध दंत महाविद्यालयांच्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी. मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला लवकरच १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या महाविद्यालयाचा संपूर्ण देशात नावलौकिक आहे. महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांनाही माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करावे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन रुग्णांची सेवा करावी, असे आवाहनही दीक्षित यांनी यावेळी केले. विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने हे महाविद्यालय चांगले असून, विद्यार्थ्यांच्या समस्या विचारात घेऊन त्या सोडवल्या जातात. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने स्थानिक पालकत्व योजना सुरू केली आहे. आॅर्थर रोड कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य सेवा योजना सुरू करण्यात आल्याचेही शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)