शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

दंत चिकित्सेचे माहेरघर

By admin | Updated: May 1, 2017 05:21 IST

सरकारी दवाखाने म्हटले की अंगावर काटा येतो. सर्वत्र पसरलेली घाण, डॉक्टरांची अनास्था आणि उपचारासाठी तासन्तास तिष्ठत बसलेले रुग्ण

अतुल कुलकर्णी / मुंबईसरकारी दवाखाने म्हटले की अंगावर काटा येतो. सर्वत्र पसरलेली घाण, डॉक्टरांची अनास्था आणि उपचारासाठी तासन्तास तिष्ठत बसलेले रुग्ण. हे चित्र कोणत्याही जिल्ह्याच्या रुग्णालयात नवे नाही. मात्र पुण्याचे ससून हॉस्पिटल, मुंबईतले जे. जे. हॉस्पिटल यांनी आपापल्यापरीने काही ना काही चांगले करण्याचा चालवलेला प्रयत्न ही या सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट. अशीच ही चांगली गोष्ट आहे, मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची.थ्रीडी तंत्रज्ञान वापरणारे हे देशातले एकमेव दंत महाविद्यालय असून त्यासाठी या महाविद्यालयास  थ्रीडी ट्रीनिटी पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. आज एक मेच्या निमित्ताने अशा चांगल्या उपक्रमाची कौतुकाने दखल घ्यावी असे हे काम आहे.वर्षाला येथे अडीच ते तीन लाख रुग्ण तपासणी व उपचाराचा फायदा घेत आहेत. भारतीय दंत परिषदेच्या मानकानुसार बी.डी.एस. पदवी, व एम.डी.एस. पदव्युत्तर शिक्षण देणारी देशातील ही सर्वात पहिली संस्था आहे. आज या ठिकाणी दररोज ४०० नवीन रुग्णांची तपासणी होते तर रोज १५०० रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकाराचे दंतोपचार केले जात आहेत. रुट कॅनल, दंत भरण, दात काढणे, लहान मोठ्या शस्त्रक्रिया, दाताच्या स्वच्छतेपासून ते हिरड्यांची शस्त्रक्रिया, संपूर्ण कवळी काढता घालता येणारे तंत्रज्ञान, कृत्रीम दात बसवणे, वेडेवाकडे दात सरळ करणे आदी उपचार येथे होतात. आज अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, मंत्री, आमदार या डेन्टल कॉलेजचे नियमित पेशंट आहेत. त्यापेक्षा जमेची बाजू आणखी कोणती हवी. येथे असणारे डीन डॉ. मानसिंग पवार आणि त्यांची टीम ज्या जिद्दीने हे काम करत आली आहे आणि त्याहीपेक्षा ज्या आपलेपणाने येथे शिकणारे विद्यार्थी रुग्णांची तपासणी करताना दिसतात. त्याचे एक मेच्या निमित्ताने कौतुक करायचे नाही तर कधी करायचे...?कॅडकॅमचा दीड हजारांना फायदाकॉम्प्युटर अ‍ॅडेड डिझाईन आणि कॉम्प्युटर अ‍ॅडेड मशिनींग याला कॅडकॅम म्हणतात. त्याचा वापर नकली दात बनवण्यासाठीची ही यंत्रणा आत्ता कुठे खाजगी दवाखान्यांमधून येत असताना शासकीय दंत महाविद्यालयात आजपर्यंत त्याचा फायदा दीड हजार रुग्णांनी घेतला आहे. सिरॅमिकचे कृत्रीम दात तयार करणारी ही यंत्रणा आहे. दातांचा कर्करोग तपासण्यासाठी व्हिलोस्कोपची यंत्रणा येथेच आहे. डिजीटल डेन्टल सिम्युलेटर ही विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी व चाचणीसाठीची यंत्रणा देशात याच एका शासकीय दंत महाविद्यालयात आहे. डेंटल लेझर, पेन्टा हेड मायक्रोस्कोप या गोष्टी आमच्याकडे आहेत असे अधिष्ठाता डॉ. मानसिंग पवार अभिमानाने सांगतात. येत्या काळात ओरल कॅन्सर, ट्रॉमा केअरची देखील सुरुवात या ठिकाणी केली जाणार असून त्या दृष्टीने हे कॉलेज काम करत असल्याचे ते म्हणाले.