शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांचा हल्ला; सहा पोलीस जखमी डहाणूतील घटना : दोघांना पकडले

By admin | Updated: December 6, 2014 03:05 IST

डहाणू तालुक्यातील आंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना मार लागला आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील आंबोली येथे महामार्गावर शुक्रवारी पहाटे दरोडेखोरांना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस निरीक्षकासह सहा पोलिसांना मार लागला आहे. मात्र पाच दरोडेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी पकडले आहे, तर इतर तिघे जण पळून गेले.मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सतत पडणारे दरोडे व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कासा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवि मगर यांनी एका खासगी लक्झरीमध्ये सापळा रचला होता. पहाटे २च्या सुमारास महामार्गावरील आंबोली (कोटबीपाडा) येथे टायर पंक्चर झाल्याचे नाटक करून बस थांबविण्यात आली. त्या वेळी दबा धरून बसलेले दोन दरोडेखोर तेथे आले आणि त्यांनी साध्या वेशातील महिला पोलिसांना दमदाटी करीत एकीच्या गळ््यातील सोन्याची चेन खेचून घेतली. त्यानंतर लगेचच इतर तीन दरोडेखोर तिथे आले आणि त्यांनी महिलांकडे दागिने व पैशांची मागणी केली. त्या वेळी साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.या वेळी झालेल्या झटापटीत रवि मगर यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर कासा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संगीता कहार, पूनम भामरे, पदमा अहीर तसेच हरी जाधव, पांडुरंग गवळी, शशी पाटील हे पोलीसही जखमी झाले.