शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांनो वाय-फाय हवंय? मग इथे क्लिक करा...

By admin | Updated: January 14, 2017 08:35 IST

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहर-उपनगरात ५०० वायफाय हॉटस्पॉटचे उद्घाटन केले. शहर-उपनगरातील

स्रेहा मोरे / मुंबईगेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहर-उपनगरात ५०० वायफाय हॉटस्पॉटचे उद्घाटन केले. शहर-उपनगरातील ‘आपले सरकार मुम वायफाय’ या वायफाय सेवेला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. घाटकोपर ६० फीट मार्ग, वांद्रे कलानगर, चेंबूर सद्गुरु हॉटेलनजीक, फॅशन स्ट्रीट, बोरीवली येथील शिवाजीनगर, रेणुकानगर कांदिवली अशा ठिकठिकाणी या वायफाय सेवेचा लाभ घेत मुंबईकर ‘टेक्नोसॅव्ही’ झाल्याचे दिसून आले. मुंबईतील महत्त्वाची महाविद्यालये, जिथे विद्यार्थी-विद्यार्थिनी सतत वावरतात अशा जागीही वायफाय सेवा पुरवण्यात आली आहे. शिवाय गेट वे आॅफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी व काही महत्त्वाच्या झोपडपट्ट्या येथेही हे वायफाय हॉटस्पॉट आहेत. २ ते ८ जानेवारी यादरम्यान वायफायची चाचणी घेण्यात आली. यावेळी जवळपास २३ हजार युझर्सकडून याचा वापर झाला. तसेच, दोन टीबी पेक्षा जास्त डेटा डाऊनलोड झाला. मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून १ मे २०१७ पर्यंत संपूर्ण मुंबईत १२०० वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात येतील. ‘मुंबई वायफाय’ ही देशातील सर्वांत मोठी वायफाय सेवा असून जगातील सर्वांत मोठ्या वायफाय सेवांमध्येही याची गणना होईल. मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरूनही ही माहिती दिली आहे. तुमच्या परिसरातील वायफाय हॉटस्पॉट https://t.co/89CSobykNI  या लिंकवर तुम्ही शोधू शकता.वन टाइम पासवर्ड : वायफायला जोडण्यासाठी भ्रमणध्वनीचा क्रमांक नोंदणी केल्यावर त्यावर एक ‘वन टाइम’ पासवर्ड येईल. त्यानंतर वायफायशी जोडून घेता येईल. दिवसभरात एका व्यक्तीला फक्त अर्धा तास १०० एमबीपर्यंत डेटा वापरता येईल. त्यानंतर तो आपोआप इंटरनेटपासून तोडला जाईल. या वायफाय सेवेत वापरायोग्य नसलेली सर्व संकेतस्थळे ब्लॉक करण्यात आली आहेत. त्याच वेळी अर्धा तास झाल्यावरही सरकारी संकेतस्थळाशी वापरकर्ता जोडला जाऊ शकेल.

वायफाय सेवेशी कनेक्टमहाविद्यालयीन प्रकल्प लागणारी माहिती या सेवेमुळे मिळवणे सोपे झाल्यामुळे आमचा ग्रुप या ठिकाणी येऊन वायफाय सेवेशी कनेक्ट होतो. - सोनम रहेजा, घाटकोपर.इंटरनेटचा खर्च वाचतोयया वायफाय सेवेमुळे इंटरनेटचा खर्च वाचतो आहे. त्या खर्चात पॉकेटमनी वाचवून आम्ही मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करणार आहोत.- आदित्य केणी, फॅशन स्ट्रीट.

कनेक्टीव्हीटी फास्टया वायफायची कनेक्टीव्हीटी फास्ट आहे, कुकिंगची आवड असल्याने या वायफाय सेवेशी कनेक्ट करुन यू-ट्युबवर व्हिडिओ पाहत असते.- उज्ज्वला साळुंके, सीएसटी.