शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

भावनिक राजकारण की विकासाचेही बोलता? तीन वर्षांनंतर नागपुरात अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:54 IST

 सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावनिक मुद्द्यांवरून सत्तापक्ष आणि विरोधक  हमरीतुमरीवर आलेले असताना राज्य विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातही भावनांचेच राजकारण दोन्ही बाजू करणार की विकासाच्या मुद्द्यांवर काही ठोस चर्चा, अन् घोषणा होणार, याकडे लक्ष लागले आहे. 

तब्बल तीन वर्षांनंतर नागपुरात हे दोन आठवड्यांचे अधिवेशन होत आहे.  सत्ताधारी आणि विरोधक भावनिक प्रश्नांवर एकमेकांशी भिडलेले असताना विधिमंडळही अशाच मुद्द्यांवरून कुस्तीचा आखाडा होणार असेल तर नडलेल्या, अडलेल्या, ग्रासलेल्या जनतेने कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न असेल. 

 नागपूरचे अधिवेशन म्हटले की विदर्भ, मराठवाडा येथील प्रश्न सुटण्याची अपेक्षा असते. त्यातच कोरोनाने सामान्यांचे कंबरडे मोडले, अनेकांचा रोजगार गेला, शेतकरी आत्महत्या वाढल्या. नागपुरातील उद्योग गुजरातमध्ये पळविल्याचा विषयही ताजा आहे. सध्याचे सरकार आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस विदर्भाला काय देतात, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

भावनिक जोडे बाहेर ठेवा, प्रश्न सोडवाnभावनिक पेटवापेटवीच्या विषयांचे जोडे विधानभवनाच्या आठ दिवसांत तरी विधानभवनाच्या बाहेर ठेवा, दोन्ही सभागृहांत प्रश्नांवर चर्चा करा, सरकारला धारेवर धरा, अशी विरोधकांकडून अपेक्षा आहे. nत्याचवेळी भावनिकतेत अडकण्यापेक्षा मायबाप सरकार काय देऊन जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरकेंद्रित विदर्भ विकास आमगावपासून खामगावपर्यंत नेण्यासाठी काही नवीन घोषणा ते करतील हा कळीचा मुद्दाही आहेच.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन