शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती देता का? सरकारी कार्यालये म्हणतात ‘नाही... नाही!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 09:46 IST

पारदर्शी कारभारात खोडा :  यूपीएससी, एमपीएससीसह शासकीय रुग्णालये म्हणाले, ‘त्रयस्थ पक्षाची माहिती देणे अभिप्रेत नाही’

- सुधीर लंकेलोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणे सोपे आहे. पण, हा घोटाळा उघड करणे कायदेशीरदृष्ट्या अवघड आहे. याचा अनुभव ‘लोकमत’ने घेतला. ‘युपीएससी’, ‘एमपीएससी’ या संस्था त्यांनी निवडलेल्या दिव्यांग उमेदवारांची प्रमाणपत्र दाखवायला तयार नाहीत. ज्या शासकीय रुग्णालयांनी ही प्रमाणपत्र दिली ती रुग्णालयेही ‘त्रयस्थ माहिती’ म्हणून ही माहिती नाकारत आहेत.

पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे ‘आयएएस’ पद मिळवले होते. तिला हे प्रमाणपत्र नगरच्या जिल्हा रुग्णालयातून मिळाले. हे प्रमाणपत्र, तसेच जी कागदपत्र व वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे हे प्रमाणपत्र दिले गेले, त्याची माहिती ‘लोकमत’ने नगर जिल्हा रुग्णालयाकडे मागितली होती. पण, ‘त्रयस्थ पक्षाची माहिती देणे अभिप्रेत नाही,’ असे सांगत जनमाहिती अधिकारी डॉ. साहेबराव डवरे यांनी ही माहिती नाकारली. नगर जिल्हा रुग्णालयातील काही दिव्यांग प्रमाणपत्रांची ससून रुग्णालयात पडताळणी झाली. याचा अहवाल ससूनकडे माहिती अधिकारात मागितला तर जनमाहिती अधिकारी गोरोबा आवटे यांनीही वरीलप्रमाणेच उत्तर देत माहिती नाकारली.केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) ‘नागरी सेवा परीक्षा’ देऊन जे दिव्यांग उमेदवार २००० ते २०२४ या काळात निवडले गेले, त्यांची यादी व दिव्यांग प्रमाणपत्रे ‘लोकमत’ने आयोगाकडे माहिती अधिकारात मागितली. त्यावर ‘२००२नंतरच्या निवड याद्या संकेतस्थळावर पाहाव्यात. तसेच वैयक्तिक माहिती देता येत नाही,’ असे उत्तर आयोगाचे माहिती अधिकारी अंशुमन मिश्रा यांनी कळवले. राज्य लोकसेवा आयोगाकडे २००० पासून दिव्यांग संवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांची यादी व प्रमाणपत्र मागितली असता ‘माहितीचे संकलन व पृथ:करण करून माहिती देणे अपेक्षित नाही’, असे उत्तर माहिती अधिकारी मनीषा खाडे यांनी दिले.

देशव्यापी घोटाळ्याची शक्यताnदिव्यांग प्रमाणपत्र देणारी रुग्णालये व याप्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी देणाऱ्या लोकसेवा व राज्यसेवा आयोगासारख्या संस्था या सर्वांनी एकसुरात माहिती नाकारली. nत्यामुळे या प्रमाणपत्रांबाबत आणखी संशय निर्माण झाला आहे. दिव्यांग प्रमाणपत्रांत देशव्यापी घोटाळा असण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती द्याशासकीय कर्मचाऱ्यांना ज्या प्रमाणपत्रांच्या आधारे व ज्या संवर्गातून नोकरी मिळाली, त्या प्रमाणपत्रांबाबत माहिती जाणून घेण्याचा नागरिकांना अधिकार आहे. कारण, अशा प्रमाणपत्रांचे ‘पब्लिक ऑडिट’ व्हायला हवे. यात व्यापक जनहित आहे. संबंधित संस्थांनी स्वत:हून ही प्रमाणपत्र संकेतस्थळावर खुली करावीत, असा निकाल अमरावती खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत ३ एप्रिल २०२४ रोजी दिला आहे.या निकालाकडे ‘लोकमत’ने नगरचे रुग्णालय, ससून, युपीएससी यांचे लक्ष वेधले. अद्याप माहिती मिळालेली नाही.