शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘झेडपी’च्या चाव्या चोरांच्या हातात नकोत

By admin | Updated: February 17, 2017 01:22 IST

मुख्यमंत्र्यांचा घणाघात : कोल्हापुरात परिवर्तन अटळ; बंटी-मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत

हातकणंगले : विकासाचा पैसा योग्य मार्गाने खर्च व्हायचा असेल, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेच्या चाव्या चोरांच्या हातात देऊ नका, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी कोरोची (ता. हातकणंगले) येथील जाहीर सभेत केली. कोल्हापूर जिल्ह्यात आता परिवर्तन अटळ आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांची बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यामुळे त्यामध्ये पुन्हा तुमच्या मताचे डिपॉझिट ठेवू नका नाहीतर मुद्दलही परत मिळणार नाही, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा झाली. त्यास रणरणत्या उन्हातही लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, शाहू गु्रपचे समरजित घाटगे, बाबा देसाई, रजनीताई मगदूम, आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यांतील मातब्बर नेत्यांची मांदियाळी आता भाजपमध्ये असल्याने २४ तारखेला भाजपचा जिल्हा परिषदेतील नवीन अध्यक्ष घेऊनच आम्ही तुम्हाला भेटायला येतो, अशी ग्वाही आमदार हाळवणकर यांनी दिली. यावेळी भाजपच्या जाहीरनाम्याचे व प्रचारफितीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्र्यांनी या सभेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा तर केलाच. त्याशिवाय त्याच्या हितासाठी कोणत्या योजना राबविल्या, ‘जलयुक्त शिवार’मधून झालेली सिंचनाची कामे, उसाची एफआरपी, थेट बाजार, गट शेतीची योजना आणि शेतीला लागेल तेवढा वीजपुरवठा यावरच जास्त भर दिला. ही सभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रभाव क्षेत्रात होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारच अग्रक्रमाने शेतकरी हिताचा कारभार करत असल्याचे ठासून सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,‘गेल्या सव्वा दोन वर्षांत सगळे बदलून टाकले असा आमचा दावा नाही; परंतु हे सरकार समाजातील प्रत्येक घटकांसाठी काही करत आहे, असा विश्वास सामान्य माणसांच्या मनात निर्माण करू शकलो हे मोठे यश आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर राज्यात ६८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. दिल्लीत १२ हजार तर शेजारच्या कर्नाटकात अवघी ४ हजार कोटींची गुंतवणूक झाली म्हणजे भारतातील सगळ्या राज्यांत जेवढी झाली त्याहून जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. सरकारच्या पारदर्शक कारभाराचा हा परिणाम आहे. शहरे असोत की ग्रामीण भाग, सरकार आता त्यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहे. हा निधी खर्च करण्याचे जिल्हा परिषद हे माध्यम आहे. तिथे चांगला कारभार करणाऱ्या भाजपच्या उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या. विरोधकांना निवडून देऊन झेडपीच्या चाव्या चोरांच्या हातात जाऊ देऊ नका.’‘स्वाभिमानी’ बेदखल...स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व भाजपच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या सभेत संघटनेबद्दल मुख्यमंत्री किंवा अन्य कोण काही बोलते का, याबद्दल उत्सुकता होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह कुणीच संघटनेबद्दल अवाक्षरही बोलले नाही. भाषण नव्हे जीआर वाचनमुख्यमंत्री दुपारी साडेतीन वाजता बोलायला उभे राहिले. त्यांनी अर्ध्या तासात दोनवेळा पाणी पिऊन खणखणीत आवाजात भाषण केले; परंतु त्यातील २० ते २२ मिनिटे त्यांनी जीआरचेच वाचन केल्यासारखे भाषण केले.‘एफआरपी’ आमच्यामुळेच..उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त ५० टक्केच एफआरपी मिळाली आहे; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९८ टक्के एफआरपी मिळवून देण्यात राज्य सरकार यशस्वी झाले आहे व एवढी एफआरपी देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.सदाभाऊंची दांडी..सांगलीतील सभेला कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत गळ््यात भाजपचे उपरणे घालून व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु या सभेला मात्र सदाभाऊ आले नाहीत. त्यामुळे उपस्थितीत लोकांतही त्याची चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते; परंतु वेळेअभावी ते सभेत बोलले नाहीत. पालकमंत्री असल्याने त्यांनी किमान पाच मिनिटे तरी बोलायला हवे होते, अशीही चर्चा यावेळी झाली.कोरोची (ता. हातकणंगले) येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनाम्याचे व प्रचार गीताचे अनावरण करण्यात आले. यावेळी हिंदुराव शेळके, आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे, धैर्यशील माने, माजी आमदार राजीव आवळे आदी.