रोहा : तालुका व रेल्वे स्थानक परिसरात सणांदरम्यान वाढीव पोलीस गस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. सर्व नागरिकांनी उत्सवांचा आनंद जरूर लुटावा परंतु कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी केले. तर आपल्या परिसरात समाजात तेढ निर्माण करणारे प्रसंग उद्भवल्यास अशा प्रसंगी सामोपचाराची भूमिका शांतता समितीच्या सदस्यांनी घ्यावी अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी व्यक्त केली.रोहा शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्याची शांतता समितीची सभा संपन्न झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे म्हणाले की, नागरिकांनी आजच्या शांतता समितीच्या सभेत उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येईल. परंतु नागरिकांनी देखील दहीहंडी, गौरी, गणेशोत्सव तसेच बकरी ईद या सणांदरम्यान समाजात तेढ निर्माण करणारे प्रसंग टाळण्यासाठी प्रबोधनात्मक देखावे उभारावेत तसेच आपल्या परिसरात समाजात तेढ निर्माण करणारे प्रसंग उद्भवल्यास अशा प्रसंगी सामोपचाराची भूमिका शांतता समितीच्या सदस्यांनी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी रोहा शहरातील वाहतूक समस्या तसेच रोहा रेल्वे स्थानक परिसरात सणांदरम्यान वाढीव पोलीस गस्तीसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले. (वार्ताहर)>विविध समस्याउपस्थित नागरिकांनी शहरातील वाहतूक समस्या, अष्टमी नाका परिसरात पोलीस चौकी, कोलाड, धाटाव, चणेरा परिसरातील वाढते गावठी दारूचे धंदे, मेढा विभागातील वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, बसस्थानक परिसराला पडलेला फेरीवाल्यांचा विळखा, कामगार वाहतुक करणाऱ्या बसेस, दहीहंडीच्या उंचीवरील तसेच गोविंदांच्या वयोमर्यादेबाबत,निर्माल्य टाकण्याची व्यवस्था करणे, विसर्जन घाटावर लाईफ गार्ड व्यवस्था आदीबाबत विचार मांडले.
कायद्याचे उल्लंघन करू नका
By admin | Updated: August 25, 2016 02:56 IST