शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘सहारा’ सारखी अवस्था करून घेऊ नका , डीएसकेंना १ फेब्रुवारीपर्यंत मुदत : हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:56 IST

डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले.

मुंबई : डीएसकेंना पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये दिलेल्या मुदतीत भरण्यास अपयश आले आहे. त्यामुळे संतापलेल्या उच्च न्यायालयाने डीएसकेंना धारेवर धरले. ‘सहारा’सारखी अवस्था करून घेऊ नका. तुम्हाला (डीएसके) कारागृहात टाकण्यासाठी एक क्षणही लागणार नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने त्यांना तंबी दिली. गुंतवणूकदारांचे पैसे मिळावेत, म्हणून न्यायालयाने पुन्हा डीएसकेंना पैसे भरण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली.२२ डिसेंबरच्या सुनावणीत डीएसकेंच्या वकिलांनी ५० कोटी रुपये भरण्यासाठी ७२ तासांची मुदत मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना २५ जानेवारीपर्यंत पैसे भरण्याचा आदेश दिला होता. मात्र, बँकेच्या तांत्रिक अडचणींमुळे डीएसकेंच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये जमा होऊ शकले नाहीत. त्यामुळे डीएसके न्यायालयात पैसे जमा करण्यास अपयशी ठरले.डीएसके मुदतीत पैसे जमा करू न शकल्याने न्यायालयाचा संताप व्यक्त केला. डीएसकेंना कोठडीत पाठवून गुंतवणुकदारांना पैसे मिळणार नाहीत, अशी खंतही बोलून दाखवली. त्यांच्या लिलाव करण्यायोग्य मालमत्तांची यादी २ फेब्रुवारीपर्यंत द्या, असे पोलिसांना सांगितले. डीएसकेंना ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला आहे. गुंतणूकदारांचे पैसे थकविल्याने पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण त्यांच्यावर विभागाने गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी त्यांच्या मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली, तर बँकांनाही त्यांची खाती गोठविण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट