शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मांझींना पाठिंबा देण्याचे पाप करु नका - उद्धव ठाकरेंचे भाजपाला खडे बोल

By admin | Updated: February 16, 2015 12:53 IST

राजकीय स्वार्थासाठी विकासकामातील कमिशनखोरीचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना समर्थन देण्याचे पाप करु नका असे खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १६ - राजकीय स्वार्थासाठी विकासकामातील कमिशनखोरीचे  समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याचे पाप करु नका असे खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावले आहेत. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता बिहारमधील राजकीय संघर्षावरुन शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपावर टीका केली. विकासकामांसाठी कमिशन मिळत असल्याचा स्फोट बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांनी केला होता. हेच कमिशनबाज मुख्यमंत्री आता भाजपाच्या पाठिंब्यावर बिहार विधानसभेत बहुमत जिंकण्याची तयार करत आहे असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. भ्रष्टाचाराचे खुले समर्थन करणारे, पक्षाचा आदेश  न जुमानणारे मांझी हे मुख्यमंत्री झाल्यापासून अडाणी पद्धतीने वागत आहे असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. भाजपा मांझी यांना नितीशकुमारांविरोधात खेळवत असून मांझींना समर्थन देणे म्हणजे राजकारणातील काळ्या पर्वाची बाजू घेण्यासारखे आहे अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.