शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:57 IST

शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. सरकार जरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले.

ठळक मुद्देकृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा द्यामराठा आरक्षणासाठी विद्यमान सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहेअन्नप्रक्रिया, उत्पादन क्षेत्राकडे समाजाने वळावे

औरंगाबाद, दि. ५ : शांततापूर्ण वातावरणात देशाच्या इतिहासात नोंद होईल, असे मोर्चे मराठा समाजाने आरक्षण व इतर मागण्यांसाठी सहनशीलतेने काढले. सरकार जरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी समाजाच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरूवारी व्यक्त केले.

श्रीहरी पॅव्हेलियन येथे शिवाई एमबीएन विकास मंडळातर्फे भरविण्यात आलेल्या एबीएन एक्सपो या उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे, आ. अतुल सावे, आ. सतीष चव्हाण, आ. विक्रम काळे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, माजी आ. कल्याण काळे, प्रदीप सोळूंके, रंगनाथ काळे, जि.प.अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, गीता देशमुख, अनुश्री मुळे, वृषाली देशमुख यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, आरक्षणाने सर्व प्रश्न सुटतीलच असे नाही. शिष्यवृत्ती मिळाली तरी आजच्या शिक्षणाचा खर्च कमी नाही. त्यामुळे तरुण-तरुणींनी उद्योग, व्यापाराकडे वळाले पाहिजे. खा.दानवे यांना उद्देश्यून ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पुर्ण ताकद लावा. मतभेद असतील तर ते दूर करून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमिती समोर आणा. कायदेशीर अडचणी आहेत. नवीन आलेले सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु समाजात खदखद वाढलेली आहे. सहनशीलता संपत आली आहे. खा.दानवे यांनी सरकार उद्योगवृध्दीसाठी करीत असलेल्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला. 

कृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा द्याकृषिमुल्य आयोगाला वैधानिक दर्जा दिला जावा. शेतमालाचे भाव कोसळले तरी शेतक-यांना कायद्याने भाव मिळेल. गेल्यावर्षी तुर खरेदीत सरकारचे अंदाज चुकले आहेत. कृषि अर्थव्यवस्था मजूबत झाली पाहिजे. शेतीवर सगळ्या समाजाचे पोट भरते. परंतु शेतीवर अवलंबून राहणे जमणार नाही. नोक-यांचे काही खरे नाही. माहिती-तंत्रज्ञानामुळे अनेक नोक-यांवर गदा येत आहे. नोक-यांना गृहित धरु नका. अन्नप्रक्रिया, उत्पादन क्षेत्राकडे समाजाने वळावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण