शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीऐवजी मृगजळामागे धावू नका

By admin | Updated: June 19, 2017 02:39 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगारांना पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कामगारांना पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने कामगारांना मृगजळापाठी धावण्यास प्रवृत्त करू नये, असा टोला एसटीचे महाव्यवस्थापक माधव काळे यांनी लगावला आहे.काळे यांनी मान्यताप्राप्त संघटनेला पाठवलेल्या पत्रात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. काळे म्हणाले की, संघटनेने केलेली मागणी अयोग्य आहे. वेतनवाढीसाठी पदनिहाय नक्की किती टक्के वेतनवाढ हवी आहे, याचा ठोस प्रस्ताव संघटनेने द्यावा. मात्र, संघटनेकडून प्रस्ताव देण्याऐवजी पदनिहाय वेतनश्रेण्यांसह सातवा वेतन आयोगाची मागणी केली जात आहे. मुळात या आधीच प्रशासनाने संघटनेला ३० एप्रिल २०१७ पर्यंत कामगार करार करण्याचे निर्देश दिले होते. महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही कामगारांना जेवढे देणे शक्य होईल, तेवढा आर्थिक लाभ वेळेवर देण्याचा शासनाचा मानस आहे. मात्र, त्यासाठी वेतनवाढीचा ठोस प्रस्ताव सादर करावा, असे प्रशासनाने मान्यताप्राप्त संघटनेला १ जून २०१७ रोजीही कळवले होते, तरीही अवास्तव मागणी करणे अनाकलनीय असल्याचे काळे यांनी सांगितले आहे. महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी, कामगारांना तातडीने करार करून वेतन देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मान्यताप्राप्त संघटनेच्या नाकारलेल्या बाबींवर ठाम राहण्याच्या कृतीमुळे करारास विलंब होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तरी कामगार करार करताना, कराराच्या दिनांकापासून चार वर्षांसाठी करण्याचा व्यवस्थापनाचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.