शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विजेसाठी जिवाशी खेळू नका

By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST

उद्धव ठाकरे : सूर्यकांत दळवींच्या प्रचारसभेत पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्पाला ठाम विरोध

दापोली : केवळ दोन टक्के विजेसाठी इथल्या जिवांशी शंभर टक्के खेळणार आहात का, असा प्रश्न करून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे व राहील, याचा पुनरूच्चार केला.शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी यांच्या प्रचारार्थ शहरातील आझाद मैदानातील जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस आघाडीपाठोपाठ भाजपवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे. मात्र, राज्याचा मुख्यमंत्री दिल्लीच्या नेतृत्त्वाचा जर सेवक म्हणून राहणार असेल, त्यांच्यापुढे गुडघे टेकून नतमस्तक होणार असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे कदापी सहन करणार नाही. राज्याला अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री कोण, हे दिल्ली ठरवणार नसून, राज्यातील जनताच ठरवेल, असेही ते म्हणाले.केवळ साडेचार वर्षांचा अपवादवगळता तब्बल ६० वर्षे राज्यातील काँग्रेस आघाडी शासनाने जनतेचे शोषण केले आहे. जनतेच्या पैशावर काँग्रेसचे पुढारी काही साखरसम्राट, तर काही सत्कारसम्राट झाले. मात्र, माझा सर्वसामान्य गरीब माणूस जागेवरच राहिला. दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. या सामान्य माणसाला सम्राट बनवण्याचे स्वप्न आपण पाहात आहोत. राज्यातील गोरगरीब जनतेचा आर्थिक स्तर उंचावयाचा असेल तर आपले मत बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.रत्नागिरीच्या जाहीर सभेत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला शिवसेनेचा जाहीर विरोध प्रकट करतानाच दापोलीतीलही सभेत त्यांनी जैतापूरच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले की, या प्रकल्पात निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला यातील २ टक्के वीज मिळणार आहे. केवळ २ टक्के विजेसाठी आपण येथील जनतेच्या जिवाशी कोणालाही खेळू देणार नाही. हा प्रकल्प एवढाच चांगला असेल तर तो गुजरातला जरूर न्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सभेत जैतापूरच्या मुद्द्यावर त्यांनी प्रखर विरोध दशर्विला.सभेच्या सुरुवातीला सूर्यकांत दळवी यांचेही भाषण झाले. तत्पूर्वी खेडचे सभापती अण्णा कदम, राजेंद्र निगुडकर, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांची भाषणे झाली. यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, गुहागर येथील उमेदवार विजय भोसले, मंडणगडचे तालुकाध्यक्ष संतोष घोसाळकर, दापोलीचे उपतालुकाप्रमुख उदय जावकर, जिल्हा परिषद सदस्या स्मिता जावकर, प्रकाश कालेकर, पंचायत समिती सभापती गीतांजली वेदपाठक, उपसभापती उन्मेश राणे, पंचायत समिती सदस्य श्रीपत पवार, नीलेश शेठ, माजी उपसभापती घडशी, प्रवीण घाग, अनंत वाजे उपस्थित होते. ऋषिकेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)कदमांसह अनेकांची दांडीशिवसेना नेते रामदास कदम, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोलीचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे सभेला हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा स्पष्टपणे पुढे आली.