शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणामधून नोकरीत नियुक्ती देऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:10 IST

राज्य शासनाचे सर्व विभागांना आदेश : मराठा क्रांती मोर्चाकडून नाराजी

- चेतन ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातून १६ टक्के आरक्षण मिळाले असले, तरी या आरक्षणातून उमेदवारांना नियुक्ती देऊ नका, असे आदेश शासनाने सर्व विभागांना दिले. यासंदर्भातील शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाने मंत्रालयातील सर्व विभागांचे सचिव, प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांना सोमवारी, २५ फेब्रुवारीला दिले. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चासह समाजात नाराजीचा सूर आहे.

देशात तणावाचे वातावरण असताना असे छुपे आदेश काढून सरकारने कूटनीतीने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. पोखरकर म्हणाले, मराठा आरक्षणाचे प्रकरण सध्या उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याचे कारण सरकारने दिले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती आदेश देऊ नका, असेही सरकारने सांगितले आहे. परिणामी, आरक्षणाद्वारे नोकरीत पात्र ठरल्यानंतर उमेदवारांचे भविष्य टांगणीला लागण्याची भीती निर्माण झाली आहे. आरक्षणामुळे नोकरी मिळाल्यानंतर नियुक्ती आदेश मिळेपर्यंत तरुणांना घरीच बसावे लागेल. याशिवाय इतर ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करता येणार नाही. त्यातही आरक्षणाविरोधात निकाल लागल्यास तरुणांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीतीही पोखरकर यांनी व्यक्त केली.मराठा क्रांती सेना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातसरकारने मराठा समाजासाठी केलेल्या घोषणांवर अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करत मराठा क्रांती सेनेने लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा बुधवारी केली. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एकूण २३ जागांची यादी सेनेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी जाहीर केली. मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, तिसऱ्या आघाडीत मराठा क्रांती सेनेसह बळीराजा शेतकरी संघटनाही निवडणुकांच्या रिंगणात दिसेल. मराठा आरक्षणासह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह, शिवस्मारक अशा विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी दिसत नाही. याउलट शेतमालाला हमीभाव, कर्जमाफी अशा सर्वच मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचे दिसते. त्यामुळे मराठा समाजासह शेतकऱ्यांमधील रोष या निवडणुकीत दाखवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा