शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

पवारांना धोका देणाऱ्यांना माफ करणार नाही

By admin | Updated: December 21, 2015 00:23 IST

शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही

पुणे : शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्यात विविध नेत्यांनी शरद पवार यांना पंतप्रधानपद न मिळाल्याबाबत खंत व्यक्त केली. पवार यांना त्या काळात धोका देणाऱ्यांना आपण कधीही माफ करणार नाही, असे ज्येष्ठ उद्योगपती सायरस पूनावाला यांनी सांगितले. शरद पवार यांचे महाविद्यालयीन जीवनापासून मित्र असलेले सायरस पूनावला यांनी आपल्या ५७ वर्षांच्या मैत्रीचा प्रवास उलगडला. ते म्हणाले, ‘‘पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वेळी दिल्लीत पंतप्रधानपदाची खलबते सुरू असताना, आपण पवार हे आता पंतप्रधान होणार म्हणून आपण काही मित्रांसह दिल्लीत हजर होतो. मात्र, त्यावेळी काही लोकांनी त्यांना धोका दिला. त्यांना आपण कधीही माफ केले नाही आणि करणारही नाही. पवार आणि आपण चांगलो मित्र आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत राहू. पवारांचा वारसा आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी सांभाळला असून, ते पवारांचे नाव आणखी मोठे करतील.’’शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा एकमेव नेता : प्रफुल्ल पटेल शरद पवार म्हणजे कोण, याचं उत्तर दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेला त्यांचा सर्वपक्षीय सोहळा होता अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशात आज शेतकऱ्यांच्या नावाने राजकरण करणारे अनेक नेते आहेत. मात्र, त्यांच्यासाठी अल्पव्याजदरात कर्ज, संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांची दारे उघडून दिली. आज अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं जात असलं तरी पवार यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कधीच पोहोचला होता असा उल्लेखही पटेल यांनी या वेळी केला.साहेबांच्या सल्ल्यानेच देशाचा विकास : धनंजय मुंडे देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणून पवारसाहेब ओळखले जातात. मात्र, केंद्राच्या राजकरणात गेल्या ३५ वर्षांत झालेल्या प्रत्येक पंतप्रधानासह विद्यमान पंतप्रधानही पवारांचा सल्ला घेत असल्याने देशाच्या विकासात पवार यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या वेळी बोलताना केले.महाराष्ट्राची सर्वांगीण माहिती असलेला एकमेव नेता : पतंगराव कदम महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात चौफेर वावर आणि प्रवास असलेले पवार हे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल माहीत असलेले एकमेव नेते असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री पतंगराव कदम यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने आणि केंद्राने सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली. एक उत्तम राज्यकर्ता, शासनकर्ता कसा असावा याचे आदर्श उदाहरण पवार आहेत. सर्वसामान्य माणूस डोळ्यांसमोर ठेवून ते नेहमी कार्यरत राहिले. तर त्यांच्या या कार्याला पडद्याआडून प्रतिभाताई पवार यांनी ताकद दिली. या वेळी पंतप्रधानपदासाठी अनुकूल वातावरण असताना, पवार हे पुन्हा राज्यात आले याबाबत आपल्याला आवडले नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (प्रतिनिधी)गरिबांच्या कल्याणाचे धोरण स्वीकारावेजात-धर्म बाजूला ठेवून भाईचारा जपण्याचे, गरिबांच्या कल्याणाचे पवारांचे धोरण सगळ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी या वेळी उपस्थितांना केले. सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पवार नेहमीच आग्रही राहिले. वेळ प्रसंगी त्यांनी राजकीय विरोध पत्कारून त्यांनी मराठवाडा विद्यापीठचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेन नामांतरण केले. समाजातील वं़चित घटकाला न्याय देण्यासाठी मंडल आयोग लागू करून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण उपलब्ध करून दिले. महिलांना आधी 33 टक्के आरक्षण आणि नंतर ५० टक्के आरक्षण देण्यास आग्रही राहिले. अशा प्रसंगी त्यांनी कधीही आपल्या राजकणात तसेच समाजकारणात जात, धर्म न आणता भाईचारा जपण्याचे काम केले.मी हरलो म्हणून बरे झालेमुंबईत मी शिवसेनेचा महापौर असताना गरवारे क्रिकेट क्लबच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी मला शरद पवार यांच्याविरुद्ध उभे करण्यात आले होते, त्या वेळी मी हरलो म्हणून बरे झाले. मी अध्यक्ष झालो असतो तर कार्यकाळ संपवून शांत बसलो असतो. पवार निवडून आल्यानंतर मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बीसीसीआयचे अध्यक्ष त्यानंतर आयसीसीआयचे अध्यक्ष अशा एकएक पायऱ्या चढत गेले अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.