शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये- अमित शाह

By admin | Updated: June 5, 2016 15:54 IST

यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 5-  यापूर्वीच्या चुकीच्या सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारांच्या फौजा तयार झाल्या. युवक या देशाची ताकद बनण्याऐवजी देशावरचे ओझे बनले. हे चित्र पालटवण्यासाठी देशाचे भाग्य बदलणाऱ्या योजना मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. त्याविरुद्धच्या भ्रामक प्रचाराला युवकांनी बळी पडू नये, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी केले.राज्य सरकारच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या प्रसारासाठी भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे, संजय पाटील, पुण्यातील आमदार, नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी प्रास्ताविक केले. खासदार अनिल शिरोळे यांनी आभार मानले.शहा म्हणाले, जगातले सर्वाधिक युवक भारतात आहेत. भारत हा तरुणांचा देश आहे. युवकांच्या हातांना काम देण्याची रणनीती आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी राजकीय इच्छाशक्ती नरेंद्र मोदींकडे आहे. रोजगार निर्माण करण्याच्या कृषी क्षेत्राच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक शेतीवर अवलंबून असल्याने शेती फायद्यात येऊ शकत नाही. शेतीवरचे अवलंबित्त्व कमी करण्यासाठी युवकांना कौशल्याधारीत शिक्षण देण्याचे मोदींचे नियोजन आहे.ह्णह्णमेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्कील इंडिया, मुद्रा बँक, जन-धन योजना यामुळे देशाचे भाग्य बदलणार आहे. गेल्या वर्षभरात वीस लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे़ ते म्हणाले, ह्यह्यकृषी क्षेत्राला मजबूत करणे आणि बेरोजगारी निर्मुलनाच्या दिशेने मोदी सरकारची वाटचाल सुरु आहे. यंदाच्या वर्षातले पहिल्या तिमाहीचा देशाचा विकास दर जगात सर्वाधिक आहे. जीडीपी ला मानवीय दृष्टीकोन दिला आहे. केवळ कंपन्या किंवा व्यापारातील वाढ म्हणजे जीडीपी नाही़ त्याला सामाजिक सशक्तकरण्याचे साधन केले आहे. देशाचे अथर्तंत्र ताळ्यावर आहे. अपवाद वगळता महागाईवरही नियंत्रण ठेवण्यात सरकार यशस्वी झाले आहे.ह्णह्णह्यह्यसन १९७२ मध्ये कॉंग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण गरीबी हटली का,ह्णह्ण असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. कॉंग्रेसवाले दोन वर्षात कुठे आहेत ह्यअच्छे दिनह्ण म्हणून विचारत आहेत. कॉंग्रेसने ६७ वर्षात गरीबी हटवण्यासाठी जितके प्रयत्न केले नाहीत तितके मोदी सरकारने दोन वर्षात केले. मात्र गेल्या दोन वर्षात भ्रष्टाचाराचा एकही आरोप करण्याची संधी मिळाली नसल्याने कॉंग्रेसवाले बेचैन झाले आहेत, असे ते म्हणाले.